Tuesday, October 18, 2016

वनामकृवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्‍त व्याख्‍यानाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कास्ट्राईब कर्मचारी महासंघााच्‍या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती निमित्‍त “आंबेडकरी चळवळ सक्षमीकरणासाठी संविधानात्मक तत्वज्ञान आणि शासकीय अधिका-यांची भुमिका” याविषयावर माजी सनदी अधिकारी मा. ई. झेड. खोब्रागडे (भाप्रसे) यांच्‍या व्याख्यानाचे आयोजन दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ठिक ५.०० वाजता कृषि महाविद्यालयााच्‍या सभागृह करण्‍यात आले असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्र्वरलू राहणार आहेत. कार्यक्रमास शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव श्री. डी. एस. कच्छवे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदरील व्‍याख्‍यानास उपस्थित राहण्याचे आवाहन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. जी. के. लोंढे व सचिव डॉ. अनिश कांबळे यांनी केले आहे.