महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त वसंतराव
नाईक
मराठवाडा
कृषि विद्यापीठात ‘कृषिदिन’ म्हणुन साजरा करण्यात आला. यानिमित्त कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
यांच्या हस्ते कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळयाचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक
डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ.
बी. बी. भोसले, विद्यापीठ नियंत्रक श्री
विनोद गायकवाड, कृषि महाविद्यालयाचे
प्राचार्य
डॉ. डि. एन. गोखले, गृहविज्ञान महाविद्यालयाच्या
प्राचार्या प्रा. विशाला पटणम, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण कदम, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक कडाळे, अन्नतंत्रज्ञान
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरविंद सावते, सहयोगी अधिष्ठाता डॉ डि बी देवसरकर आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख व संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी, विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.