Saturday, July 8, 2017

सद्यस्थितीत पावसाच्या खंड काळात शेतीत विविध उपाययोजना करण्‍याचा वनामकृवि शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

मराठवाडयात यावर्षी पावसाचे आगमन वेळेपुर्वी होऊन जुन महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात चांगला पाऊस झाला, परंतु मागील काही दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. साधारणत: 50 ते 60 टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत, पावसाच्या वितरणामध्येही तफावत दिसून येत आहे. द्या पिके वाढीच्या अवस्थेमध्ये असून पावसाच्या प्रतिक्षेत आहेत, या पिकांना जमिनी ओलाव असणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत पुढील प्रमाणे पिकाचे व्यवस्थापन करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ भगवान आसेवार यांनी दिला आहे.
ü कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकामध्ये हलकी कोळपणी करावी, त्यामुळे मातीचे जमिनीवर च्छादन तयार होते. पिकातील माती खाली-वर करून जमिनीतून उडून जाणारा ओलावा थांबवणे, ज्या ठिकाणी भेगा पडल्या आहेत त्या बुजविणे आवश्यक आहे. या माध्यमातून पिकाला मातीची भर द्यावी.
ü संरक्षित सिंचनाची सोय असल्‍यास सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांना पाणी द्यावे. यासाठी शेततळे, विहीर, नालाबांधातील साठविलेल्या पाण्याचा वापर करावा. पाणी बचतीसाठी तुषार सिंचनाचा वापर करावा. यावर्षी जुनमध्ये सुरूवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता काही ठिकाणी आहे.
ü ज्या ठिकाणी खरीप पिकांचे क्षेत्र कमी आहे, त्याठिकाणी आच्छादनाचा वापर करावा. जमिनीतील ओलावा राखण्यासाठी आच्छादनाचा फायदा होतो. वाळलेले गवतला कडीभुसा, उसाचे पाचट, पालापाचोळा, गव्हाचे काड, सोयाबीन भुसा किंवा गिरीपुष्प, सुबाभूळयाचा पाला हेक्टर3 ते 5 टन वापरावा.
ü वाऱ्याचा वेग कमी असतानां सकाळी किंवा सायंकाळी पाणी द्यावे. बाष्पीभवन कमी होईल याची काळजी घ्यावी. पिकाला एक सरी आड एक सरी पाणी द्यावे. पाण्याच्या चाऱ्यांची दुरूस्ती करावी, त्यामुळे पाणी वाया जाणार नाही.
ü ऊसामध्ये पाचट च्छादन करावे. प्रति टन पाचट कुजविण्यासाठी आठ किलो युरिया, 10 किलो सिंगल सुपर फॉस्फेट एक किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धक पाचटावर पसरून द्यावे.
ü अन्नद्रव्ये ओलावा यासाठी पिकाशी स्पर्धा करणाऱ्या तणांचे नियंत्रण करावे. विशेषत: जिरायती शेतीमध्ये तणांचे वेळीच नियंत्रण करावे. सोयाबीन, ज्वारी या पिकांत पेरणी नंतरचे 15 ते 45 दिवस तर बाजरी, मूग, उडीद 15 ते 30 दिवस कपाशी 60 ते 70 दिवस हा पीक - तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी आहे.
ü उभ्या पिकांमध्ये पेरणीनंतर आंतर मशागतीची कामे झाल्यावर साधारपणे 30 ते 35 दिवसानंतर सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांमध्ये प्रत्येक चार ओळी नंतर एक उथळ सरी काढावी. या सरीमुळे येत्या काळात पडणारा पाऊस मुरून पिकाला फायदा होईल.
ü ज्या ठिकाणी अजून पेरणी झालेली नाही, अशा ठिकाणी रूंद सरी वंरबा यंत्राचा वापर करून रूंद वरंब्यावर पिकाची पेरणी करावी. भारी, खोल काळया जमिनी ही अतिशय उपयुक्त लागवड पध्दती आहे. यामध्ये 120 ते 180 से. मी. रूदींचे वरंबे 15 ते 30 से.मी. खोलीच्या सऱ्या केल्या जातात. या सऱ्या मध्ये पावसाचे पाणी जास्त कालावधीसाठी राहते मुरते, त्याच प्रमाणे पिकाची लागवड रूंद वरंब्यावर असल्याने जास्त पाऊस झाला तरी त्याचा पिकाच्या वाढीवर दुष्परीणाम होत नाही. जास्त झालेला पाऊस सऱ्या वाटे निघून जातो.
ü जिरायती शेतीमध्ये हेक्टरी योग्य झाडांची संख्या राखणे महत्वाचे आहे. कीड,
ü पावसाच्या खंडकाळात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसू शकतो. कपाशी मावा तर काही ठिकाणी पाने कुरतडणारे नागतोडयांचा प्रादुर्भाव दिसतेा आहे. सोयाबीन पिका सुरवातीच्या अवस्थे पाने खाणाऱ्या अळया तसेच हुमणीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
ü मावा, पाने कुरतडणारे नागतोडेयांच्या नियंत्रणासाठी अॅसिटामिप्रीड 4 ग्रॅम किंवा डायमेथोएट 10 मि. ली. किंवा 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ü पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस 20 मि. ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ü पिकाच्या अवस्थेनुसार जमिनीतील ओलावा कमी झाल्यास अन्नद्रव्यांची मात्रा फवारणीतून द्यावी. या पीक 30 दिवसापर्यंत असल्यास पोटॅशिअम नायट्रेट 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे पिकांची पाण्याचा ताणसहन करण्याची क्षमता वाढते.
ü पेरणीनंतर सुरूवातीचे आंतर मशागतीचे कामे पुर्ण झाल्यावर दोन पिकांच्या ओळी ठरावीक अंतरावर जलसंधारण सरी काढावी. यासरी मध्ये पावसाचे पाणी जमा होऊन ओलावा जास्त काळ टिकून राहतो.
या विविध उपाय योजना करण्‍याचा सल्‍ला अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ भगवान आसेवार यांनी दिला आहे. (मोबाईल क्रमांक 9420037359)