वनामकृवि कृषि स्पर्धामंचाच्या 87 पदव्युत्तर विद्यार्थ्यी केले रक्तदान
कृषिचे विद्यार्थी सदैव सामाजिक कार्यासाठी तत्पर असतात, सद्यस्थितीत जिल्हयात
रग्णांना रक्तांची अत्यंत निकड असुन रक्ताचा तुटवडा भासत आहे, या परिस्थितीत
समाजभान राखुन कृषिच्या विद्यार्थ्यांचा रक्तदानाचा सकल्प निश्चितच कौतुकास्पद
आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी.
व्यंकटेश्वरलु यांनी केले. विद्यापीठातील पदव्युत्तर विद्यार्थ्यी संचलित कृषी
स्पर्धामंच व परभणी जिल्हा रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य
दिनाचे औचित्य साधुन दिनांक 16 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन वैद्यनाथ वसतीगृहात
करण्यात आले होते, शिबीराच्या उद्घाटन
प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, कुलसचिव डॉ जी के लोंढे,
प्राचार्य डॉ डी एन गोखले, वसतीगृह अधिक्षक डॉ बी एम ठोंबरे, विद्यापीठाचे आरोग्य
अधिकारी डॉ सुब्बाराव, रक्त संक्रमण अधिकारी डॉ रमेश कणकदंडे आदींची प्रमुख उपस्थिती
होती.
शिक्षण संचालक डॉ विलास पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, कृषिचे विद्यार्थ्यी
स्वच्छता मोहिम, वृक्ष लागवड मोहिम, रक्तदान शिबिर आदीमध्ये हिरारिने सहभाग
घेऊन नेहमीच सामाजिक बांधिलकी जपतात तर स्वास्थ सामाजिक आरोग्यासाठी युवकांचे
योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ डि एन गोखले म्हणाले यांनी आपल्या
भाषणात केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धामंचाचे अध्यक्ष कैलास भाकड यांनी केले.
सुत्रसंचालन विशाल पाटील यांनी तर आभार चंद्रकांत दाडगे यांनी मानले. रक्तदान
शिबिरात डॉ बी एम ठोंबरे, प्रा. आर व्ही चव्हाण आदीसह 87 पदव्युत्तर कृषि स्पर्धामंच्या
विद्यार्थ्यींनी रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी कृषि महाविद्यालयाचे
प्राध्यापक, कर्मचारी व स्पर्धामंचाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.