Tuesday, December 31, 2019

माळेगांव यात्रेनिमित्त आयोजित कृषि प्रदर्शनीतील वनामकृविच्या‍ दालनास शेतक-यांचा प्रतिसाद

नांदेड जिल्‍हयातील माळेगांव येथील यात्रेनिमित्‍त आयोजित कृषि प्रदर्शनीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या दालनास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दिनांक 26 डिसेंबर रोजी विद्यापीठ दालनास भेट देण्‍या-या शेतक-यांना विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसकर यांनी विद्यापिठ विकसित वाण व शिफारशीत कृषि तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले तसेच विद्यापीठ प्रकाशित मासिक शेतीभाती अंक देवून सभासद देऊन प्रोत्साहीत केले. यात्रे दरम्‍यान विद्यापीठ दालनास भेट देणा-या शेतक-यांना श्री वैजनाथ सातपुते यांनी मार्गदर्शन केले, त्‍याबाबत आयोजनकर्त्‍या कडुन प्रमाणपत्र देऊन सत्‍कार करण्‍यात आला.