Tuesday, January 14, 2020

राष्‍ट्रीय युवा दिनानिमित्‍त युवा संवाद भित्तिप‍त्रकाचे विमोचन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण विभागाच्‍या वतीने दिनांक 12 जानेवारी रोजी स्‍वामी विवेकानंद जयंती निमित्‍त राष्‍ट्रीय युवा दिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले हे होते तर विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, डॉ रविंद्र देशमुख, डॉ प्रशांत देशमुख, डॉ रणजित चव्‍हाण, डॉ विजयकुमार जाधव, डॉ जयश्री एकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यीं लिखित युवा संवाद भित्तिपत्रकाचे विमोचन करण्‍यात आले. मार्गदर्शनात प्रमुख व्‍यक्‍ते डॉ रविंद्र देशमुख म्‍हणाले, जगात भारत हा सर्वांत युवा देश असुन युवा शक्‍तीच्‍या जोरावरच आपण महाशक्‍ती होऊ शकतो. शासकीय नौक-यांमध्‍ये सर्वांनाच संधी मिळणार ना‍ही, त्‍यामुळे कृषि पदवीधरांनी नौक-या देणारे कृषि उद्योजक व्‍हावे असा सल्‍ला त्‍यांनी दिला तसेच डॉ विजयकुमार जाधव यांनी विद्यार्थ्‍यांनी कोणत्‍याही क्षेत्रात प्रामाणिक प्रयत्‍न केले तर यश निश्चितच मिळते असे म्‍हणाले. कार्यक्रमात पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी अजित खारगे, अमर गाढवे, गोविंद भोसले, प्रलय झाडे, लव्‍हली नारझरी आदींनी स्‍वामी विवेकांनद यांचे विचार व युवक यावर आपले मनोगत व्‍यक्‍त केले.कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ राजेश कदम यांनी केले तर सुत्रसंचलन अपुर्वा मोरे हिने केले. कार्यक्रमास महाविद्यालयातीन प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.