Saturday, October 2, 2021

राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या वतीने आयोजित फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रमास मोठा प्रतिसाद

महात्‍मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त फिट इंडिया फ्रीडम रन २.० कार्यक्रमाचे ५२ महाराष्ट्र बटालियन, नांदेड, शिवाजी महाविद्यालय, परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय यांच्या सयुंक्त विद्यमाने दिनांक २ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्‍यात आले होते. इंडिया फ्रीडम रनला प्रमुख पाहुणे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते हिरवी झेंडा दाखवुन सुरूवात करण्‍यात आली. यावेळी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सय्यद इस्माईल, नांदेड येथील एनएनसी कमांडिंग ऑफिसर श्री वेटरी वेल्‍लु, श्री हेमंतराव जामकर, उपप्राचार्य  डॉ  केशेट्टी, वाहतूक नियंत्रक अधिकारी श्री सचिन इंगेवार, प्रबंधक श्री विजय मोरे, लेफ्टनंट डॉ प्रशांत सराफ आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, आज देश स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष साजरे करीत आहे. जगाला अहिंसा, सत्‍य व सहिष्‍णुता यांची शिकवण देणारे देशाला स्‍वातंत्र मिळविण्‍यात अमुल्‍य असे योगदान महात्‍मा गांधी यांचे होते तर स्‍वातंत्र्यानंतर देशा निर्माणात अतुलनीय योगदान देणारे भारतरत्‍न लाल बहादुर शास्‍त्री यांचे कार्य आजही स्‍मरणीय आहे, त्‍यांनी देशाच्‍या संरक्षणात जवानांचे व प्रगतीत शेतक-यांचे महत्‍व ओळखुन जय जवान जय किसान हा नारा दिला. कोरोना विषाणुच्‍या प्रादुर्भावात मानव आपल्‍या आरोग्‍याबाबत अधिक सजग झाला आहे, स्‍वाथ्‍यपुर्ण जीवन जगण्‍याकरिता रोज व्‍यायाम व धावण्‍याचे महत्‍व लक्षात घेता देशाच्‍या माननीय पंतप्रधान यांच्‍या संकल्‍पनेतुन देशात फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. प्रत्‍येक व्‍यक्‍तींने व्‍यायाम व धावणे हे आपल्‍या जीवनाचा अविभाज्‍य भाग म्हमुण अंगीकार केला पाहिजे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.  

यावेळी छात्रसैनिक, महाविद्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी फिट इंडिया फ्रीडम रन मध्‍ये सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेकरिता शिवाजी महाविद्यालयाचे लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ, कृषि महाविद्यालयाचे लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख, सैन्य दलाचे श्री जमन सिंग, श्री सुनील कुमार, डॉ संतोष कोकीळ, डॉ राजू बडूरे, प्रा. प्रल्‍हाद भोपे, प्रा. राजेसाहेब रेंगे, प्रा तुकाराम फिसफिसे, श्री व्ही आर मोरे, महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी, राष्‍ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, वाहतुक नियंत्रक विभाग व जिल्हा रुग्णालय बचाव पथक कर्मचारी आदीनी प्रयत्न केले. सुत्रसंचालन छात्रसैनिक श्री चंद्रकांत सातपुते यांनी केले तर आभार लेफ्टनंट श्री प्रशांत सराफ यांनी मानले. यावेळी छात्रसैनिक, महाविद्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी फिट इंडिया फ्रीडम रन मध्‍ये सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेकरिता शिवाजी महाविद्यालयाचे लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ, कृषि महाविद्यालयाचे लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख, सैन्य दलाचे श्री जमन सिंग, श्री सुनील कुमार, डॉ संतोष कोकीळ, डॉ राजू बडूरे, प्रा. भोपे, प्रा. रेंगे, प्रा फिसफिसे, श्री व्ही आर मोरे, महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी, राष्‍ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, वाहतुक नियंत्रक विभाग व जिल्हा रुग्णालय बचाव पथक कर्मचारी आदीनी प्रयत्न केले. सुत्रसंचालन छात्रसैनिक श्री चंद्रकांत सातपुते यांनी केले तर आभार लेफ्टनंट श्री प्रशांत सराफ यांनी मानले.