कृषिक्षेत्रात शिक्षण घेत असताना कृषि विस्तार, कृषि संशोधन, सामाजिक ग्रामविकास आदी क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी सदर पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. युवकांचा कृषीक्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने कृषीशिक्षण घेणाऱ्या व या क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव कृषीथॉनमध्ये केला जातो, या पुरस्कारांची घोषणा कार्यक्रमाचे संयोजक संजय न्याहारकर यांनी केली. कृषीक्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी व शेतीविषयक नवीन संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी कृषी पदवीधरांची भूमिका महत्वाची असुन अशा उपक्रमातून त्यांना प्रेरणा मिळावी कृषी विकासामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची मानसिकता तयार करण्याचे काम करत असताना कृषीक्षेत्रात आदर्शवत कार्य व्हावे, हा यामागील मुख्य हेतू आहे.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Wednesday, November 2, 2022
कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कृषीथॉन गुणवंत विद्यार्थी पुरस्कार जाहीर
ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स
प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा कृषीथॉन गुणवंत विद्यार्थी पुरस्काराकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयचे विद्यार्थी विशाल कुलकर्णी, अभयराज परमार आणि सिध्दानाथ बिरादार यांची निवड करण्यात आली असुन पुरस्काराच्या
निवडीबद्दल कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि, शिक्षण
संचालक डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी
अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. उदय खोडके, समन्वय
अधिकारी डॉ. प्रमोदिनी मोरे आदीसह विभाग प्रमुख व प्राध्यापक
यांनी
अभिनंदन केले आहे.
विशाल कुलकर्णी
अभयराज परमार