वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दर महिन्याच्या प्रत्येक शनिवारी यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील सध्या शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाशी निगडित उपलब्ध व्यवसाय तथा नौकरीच्या संधी बद्दल मार्गदर्शन व्याख्यानमालेचे नियमितपणे आयोजन करण्यात येते, दिनांक ५ नोंव्हेबर रोजी मार्गदर्शन व्याख्यानमाला आणि माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात बॅच १९८७ चे माजी विद्यार्थी आयपीएस अधिकारी तथा सिक्कीम येथे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय विभागाचे सचिव श्री शॉन्ग बुटिया, ठाणे येथील एफडीएचे सहाय्यक आयुक्त श्री गौरव जगताप, अंदमान निकोबार येथील निवृत्त डेसिग्नेटेड ऑफिसर (फूड सेफ्टी) श्री मामेन अब्राहम, भारतीय जीवन विमा निगमाचे विकास अधिकारी श्री रंगनाथ बनाळे, बाएफ (गुजरात) चे वरिष्ठ अधिकारी श्री मेघराज सपाटे, मालेगाव येथील एमजीव्ही महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रकाश वानखेडे, आयटीआय (नाशिक) चे वरिष्ठ अध्यापक श्री जीतेंद्र पाटील, आयटीआय (मुदखेड) चे वरिष्ठ अध्यापक श्री नितीन देशपांडे, पूर्णा सहकारी साखर कारखानाचे श्री जी एन धवन, माजलगाव येथील उद्योजक श्री दिलीप राठोड आदी कार्यक्रमास विशेष उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ आर बी क्षीरसागर हे होते. याच बॅचचे महाविद्यालयात कार्यरत विभाग प्रमुख डॉ. कैलास गाढे, सहयोगी संशोधक डॉ. बाळ जाधव हे उपस्थित होते.
मार्गदर्शनात प्राचार्य प्रा. डॉ. आर. बी. क्षीरसागर म्हणाले की, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयातील माजी विद्यार्थी हेच महाविद्यालयाची संपत्ती असुन देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित अन्न प्रक्रिया व खाद्य उत्पादन कंपनीत वरिष्ठ पदावर कार्य करित आहेत, देशातील खाद्य उद्योगात मोलाचे योगदान देत आहेत. अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या अन्न प्रक्रिया क्षेत्रात कार्य करून शेतकरी बांधवाच्या कल्याणाकरिता योगदान दयावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमांत उपस्थित यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने महाविद्यालयाचे नवनियुक्त सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य प्रा. डॉ. आर. बी. क्षीरसागर सत्कार करण्यात आला. स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय हे विद्यर्थ्यांमध्ये संपूर्ण आयुष्यभरासाठी लागणारी ऊर्जा निर्माण करण्याचे केंद्र असून विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयास न विसरता महाविद्यलयाबद्दलची आत्मीयता जपणे गरजेचे असल्याची भावना आपल्या मनोगतात व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या विधायक कामांसाठी आर्थिक देण्याची ग्वाही दिली. महाविद्यालयातील सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अन्नप्रक्रिया क्षेत्रातील संधी यावर माजी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. यात एफएसएसएआय अंतर्गत उपलब्ध असलेल्या नौकरीच्या संधीं व सदरील विभागाच्या परिक्षांसाठी लागणारे मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य फूड इंडस्ट्री प्रशिक्षण आणि गरज पडल्यास गरजू विद्यार्थ्यांना नौकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी शेतकरी बांधवाकरिता मोठा कार्य करू शकतात असे प्रतिपादन करत अन्न तंत्रज्ञान विषयाचे महत्व नमूद केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यात अंमलात आणण्याच्या नवनवीन संकल्पना जसे अन्नप्रक्रिया व तत्सम उद्योगात कार्यरत अधिकारी, शासकीय अधिकारी आणि यशस्वी उद्योजक मार्गदर्शन व्याख्यानमालेचे नियमित आयोजन, अन्न तंत्रज्ञान क्षेत्रातील यशस्वी उद्योजक मेळावा आयोजन आणि विद्यार्थ्यांसाठी परिसर मुलाखतीचे (कॅम्पस इंटरव्यू) आयोजित करण्याबाबत कल्पना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम वांढेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. आगरकर, डॉ.सदावर्ते, डॉ.माचेवाड, प्रा.जोशी ए.ए., डॉ.खापरे आदीसह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठय संख्येने उपस्थित होते.