वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि लखनौ येथील भारतीय ऊस संशोधन संस्था यांच्यात दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सामंजस्य करार झाला. सामंजस्य करारावर कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि आणि भारतीय ऊस संशोधन संस्थेचे संचालक डॉ ए डी पाठक यांनी स्वाक्षरी केली. यावेळी डॉ ए के सिंग, डॉ गंगावार आदींची उपस्थिती होती. सदर करारावर विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर आणि कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ उदय खोडके यांच्या स्वाक्ष-या आहेत.
सदर करारामुळे उस पिकांतील अत्याधुनिक दीर्घकालीन संशोधन कार्यक्रम राबविण्यात येणार असुन यामुळे ऊस संशोधनात विशेषत: नॅनो तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रजनन, जैवतंत्रज्ञान, पीक उत्पादन आणि संरक्षण तंत्रज्ञान, सिंचन, पीक शरीरविज्ञान आणि जैवरसायन, विस्तार आणि अर्थशास्त्र, शेतीचे यांत्रिकीकरण आणि मूल्यवर्धन, साखर, प्रक्रिया पेय आणि गूळ आधारित उत्पादने यावर भर देण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठातील पदव्युत्तर आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांच्या संशोधन करिता मदत होणार असुन सदर संस्थेत वनस्पती रोगशास्त्र, वनस्पती सुक्ष्मजीवशास्त्र, वनस्पती जैवतंत्रज्ञान, कृषिविद्या शास्त्र, मृदा विज्ञान व कृषि रसायनशास्त्र, कृषि अभियांत्रिकी, मृद जलसंधारण, सिंचन आणि निचरा, काढणी पश्चात तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि अन्न अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, कृषी अर्थशास्त्र, विस्तार शिक्षण, संगणक अनुप्रयोग आणि सांख्यिकी आदी शाखेत कार्य केले जाते. या संशोधनाचा लाभ मराठवाडा आणि राज्यातील ऊस उत्पादकांना होणार असुन ऊस उत्पादक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर सामंजस्य करारचा आराखडा मा कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांचे मार्गदर्शनाखाली सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके यांनी तयार केला.
VNMAU signs MoU with ICAR-IISR for collaborative research work in sugarcane
Vasantrao Naik Marathwada Agricultural University, (VNMAU) Parbhani have signed Memorandum of Understanding (MoU) with ICAR-Indian Institute of Sugarcane Research (IISR), Lucknow on dt. 23rd Nov. 2022 at Lucknow for collaborative research work in sugarcane. The MoU was signed by Dr. Indra Mani, Hon’ble Vice-Chancellor, VNMAU and Dr. A.D.Pathak, Director, ICAR-IISR, Lucknow. Dr. A.K. Singh (Ag. Engg.) and Dr. Gangawar (I/C PME) were present on this occasion. The said agreement was signed by Dr D.P. Waskar, Director of Research, VNMAU and Dr. U.M. Khodke, Associate Dean, College of Agril. Engineering & Technology, Parbhani
The MoU will lead to the implementation of long-term research programs in sugarcane crops, particularly in areas such as application of nanotechnology and artificial intelligence, breeding, biotechnology, crop production and protection technologies, irrigation, crop physiology and biochemistry, extension & economics, farm mechanization, processing and value addition of sugarcane in the form of beverage and jaggery based products.
The MoU will be help for the research of post-graduate and doctorate degree students in the university related to plant pathology, plant microbiology, plant biotechnology, agronomy, soil science and agricultural chemistry, agricultural engineering, soil water conservation, irrigation and drainage, post harvest technology, process and food engineering, food technology, agricultural economics, extension education, computer applications and statistics etc. This research will benefit the sugarcane growers of Marathwada region and the state. Training will be provided by IISR to researchers, faculty, sugarcane growers and students from time to time by the IISR. MoU draft was prepared by Dr. U.M. Khodke Associate Dean, CAET, Parbhani under the guidance of Hon’ble Vice-Chancellor Dr. Indra Mani.