अमेरिकेतील फ्लोरिडो विद्यापीठात मुख्यालय असलेल्या कृषी आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय अकादमी या अग्रगण्य वैज्ञानिक संस्थेचे फेलो म्हणुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांची निवड झाली, त्यानिमित्त जपान नुकतेच पार पडलेल्या विसावी सीआयजीआर जागतिक परिषदेत त्यांना फेलो म्हणुन सन्माननित करण्यात आले. सदर आंतरराष्ट्रीय फेलो करिता निवडी झाल्याबद्दल परभणी जिल्हयातील शेतकरी बांधवांच्या वतीने कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांचा दिनांक १२ डिसेंबर रोजी अनोखा सत्कार केला. परभणी जिल्हयातील भाजीपाला शेतकरी गट आणि गोशाळा चालक यांनी स्वत:च्या शेतातील उत्पादित शेतमाल वस्तुंची भेट दिली, यात सेंद्रीय भाजीपाल्याने सजविलेली डाल देऊन सत्कार केला तसेच नैसर्गिक शेतीतील जीवामृत, गांडुळ खत, सेंद्रीय बटाटा चिप्स, मध, गिर गाईचं तुप, लाकडी घाण्याचे तेल, जिवामृत, सिताफळ, गोवरी आदी स्वत:च्या शेतीतील ब्रॅड शेतमाल वस्तु भेट देऊन आगळावेगळा सत्कार करण्यात आला.
शेतकरी बांधवानी केलेल्या सत्कार व प्रेमाबद्दल आभार व्यक्त करतांना कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, शेतकरी हाच देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी आहे, तर कृषि विद्यापीठ आहे, शेतकरी आहे, तर देशाची अन्न सुरक्षा आहे, शेतकरी आहे तरच देशाची सुरक्षा आहे. शेतकरी बांधवांनी कोणाच्याही वाढदिवस, सत्कार समारंभा प्रसंगी आपआपल्या शेतातील उत्पादित शेतमालाची भेट दयावी, यामुळे आपल्या शेतमालाची ब्रॅडिंग तयार होण्यास मदत होईल. शेतीत रासायनिक घटकांवरील अवलंबत्व कमी करून नैसर्गिक घटकांचा वापर वाढीवर भर दयावा. कृषि शास्त्रज्ञाकरिता शेतकरी बांधवाचे प्रेम हे पुरस्कारापेक्षाही मोठा गौरव असल्याचे मत व्यक्त करून शेतकरी बांधवाच्या प्रत्यक्ष शेतास भेट देऊन संवाद साधु असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी डॉ.गजानन गडदे, डॉ.दिगंबर
पटाईत, श्री बालाजी डोईजड, शेतकरी श्री
पंडितराव थोरात, श्री जनार्धन आवरगंड, श्री
प्रकाश हारकळ, श्री रमेश राऊत, श्री
शिवाजी घुले, श्री संभाजी गायकवाड, श्री
सुदाम माने, श्री रमेश चौधरी, श्री
चापके विठ्ठल, श्री अशोक खिल्लारे, श्री
बाळासाहेब घाटोळ, श्री विशाल जावळे, श्री
रामेश्वर साबळे, श्री पारनेरे आदी उपस्थित होते.