परभणी जिल्हयातील ग्रामीण युवकांकरिता महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत किमान कौशल्य विकास कार्यक्रम २०२२-२०२३ (सर्वसाधारण जिल्हास्तरीय योजना) परभणी च्या वतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन केंद्रात तीन महिण्याचे रेशीम उद्योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम (कोर्स) सुरू करण्यात येत असुन याकरिता नावनोंदणी चालु आहे. याकरिता पाचवी पास आणि ३ वर्षाचा शेती / शेती पुरक व्यवसायाचा अनुभव किंवा आठवी पास आणि १ वर्षाचा शेती / शेती पुरक व्यवसायाचा अनुभव असलेले परभणी जिल्हयातील १८ ते ४५ वयोगटातील ग्रामीण युवक पात्र आहेत. सदर कोर्स करिता अर्ज करण्याचे आवाहान करण्यात आले आहे. तरि अधिक माहिती करिता सहायक आयुक्त, श्री प्रशांत खंदारे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र किंवा रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ सी बी लटपटे (७५८८६१२६२२), श्री धनंजय मोहोड (९४०३३९२११९) यांच्याशी संपर्क साधावा.