Thursday, December 8, 2022

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी-पालक शिक्षक मेळावा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय येथे बी. टेक. पदवीच्‍या प्रथम वर्ष नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांसाठी दिनांक ७ डिेसेंबर रोजी विद्यार्थी-पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले हे होते तर  प्राचार्य डॉ आर बी क्षीरसागर, प्रा डी आर मोरे, प्रा एच. डब्लू देशपांडे, डॉ के एस गाढे, डॉ व्ही एस पवार, डॉ. व्ही डी सुर्वे, , डॉ डॉ बी एस आगरकर, प्रा. बी एम पाटील, डॉ जी एम माचेवाड, डॉ पी यू घाडगे, प्रा. ए ए जोशी, प्रा एस एम सोनकांबळे, डॉ ए पी खापरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, देशात अन्‍नधान्‍याचे विक्रमी उत्‍पादन होते, शेतकरी बांधवाच्‍या आर्थिक उन्‍नतीकरिता अन्‍न प्रक्रिया उद्योगाचा अधिकाधिक विकास होणे गरजचे असुन अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या विद्यार्थीनी या क्षेत्रात आपले योगदान दयावे असे सल्‍ला त्‍यांनी दिला.  

सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. आर. बी. क्षीरसागर म्‍हणाले की, अन्‍न तंत्रज्ञान महाविद्यालय विद्यार्थ्‍याच्‍या व्‍यक्‍तीमत्‍व विकासाकरिता प्रयत्‍नशील असुन याकरिता वेळोवेळी परिसर मुलाखती, उद्योजक मेळावे, यशस्‍वी प्रक्रिया उद्योजक, शासकीय अधिकारी यांचे व्‍याख्‍यानमालेचे आयोजन केले जाते असे सांगितले.  

कार्यक्रमात उपस्थित विदयार्थी, त्यांचे पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालायतील शैक्षणिक कामाबाबत  उपस्थित प्राध्यापकांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ बी एस आगरकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ए ए जोशी यांनी केले तर डॉ पी यू घाडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमास श्रीमती सी के भोकरे, जाधव बी ए, नरेंद्र देशमुख आदीसह महाविद्यालयातील पदवी, पदव्‍युत्‍तर आणि आचार्य पदवीचे विद्यार्थी उपस्थित होते.