वनामकृवित रेशीम उद्योजक कौशल्य विकास प्रशिक्षणाचे उदघाटन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्त्र
विभाग अंतर्गत
असलेल्या रेशीम संशोधन योजना आणि
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार
व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यामान किमान कौशल्य विकास
कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय योजना २०२२-२३ अंतर्गत तीन महिण्याच्या रेशीम उद्योजक
प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असुन सदर प्रशिक्षणाचे उदघाटन दिनांक २२ डिेसेंबर झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि होते, तर प्रमुख अतिथी म्हणुन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रशांत खंदारे, प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माइल, जिल्हा रेशीम विकास
अधिकारी श्री.
गोविंद कदम, केंद्रिय
रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ श्री. अशोक जाधव, विभाग प्रमुख डॉ.
पुरोषोत्तम नेहेरकर, रेशीम तज्ञ डॉ चंद्रकात लटपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ.
इन्द्र मणि म्हणाले की, शेतकरी बांधवाच्या आर्थिक स्थर्य करिता केवळ शेतीवर अवलंबुन
भागणार नसुन कृषि पुरक उद्योग करण्याची गरज आहे. यशस्वी उद्योजक होण्याकरिता कौशल्य
आत्मसात करणे गरजेचे आहे. येणा-या काळात परभणी कृषी विद्यापीठ शेतकरी व ग्रामीण युवकांच्या
कौशल्य विकासाकरिता विविध प्रशिक्षण आयोजित करणार आहे. या कौशल्याच्या आधारे शेतकरी
व ग्रामीण युवकांना स्वयंरोजगार सुरू करून इतरांना रोजगार देण्याकरिता सक्षम करण्याचा
प्रयत्न राहणार आहे. याचाच भाग म्हणुन रेशीम उद्योग व मधमक्षिका पालन कौशल्य प्रशिक्षण
कार्यक्रम राबविण्यात येत आहे. रेशीम किटक
व मधमाशा हे दोन्ही मानवाच्या फायद्याचे किटक असून निसर्गात समतोल राखण्यास
याची आपणास मदत होते. मधमामाच्या पोळयातील
प्रत्येक माशीचे शिस्तबध्द काम, राणी माशी, कामकरी माशी, नर माशीचे सांधीक कार्य तसेच रेशीम किटक हे स्वत:चे जीवन
समर्पन करून मानवाला रेशीम धागा देतो, यापासुन मानवास अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
प्रशिक्षणाबाबत माहिती देतांना श्री. प्रशांत खंदारे म्हणाले की, सदर प्रशिक्षण तीन महिण्याचे असून ग्रामीण भागातील युवकांत उद्योजकता विकास व्हावा व रेशीम उद्योजक निर्माण व्हावेत या उद्देश्याने आयोजित करण्यात
आले आहे. प्रास्ताविकात प्रशिक्षणाचे आयोजक डॉ चंद्रकांत
लटपटे यांनी रेशीम किटकांचा जीवनक्रम,
रेशीम किटक संकरवाण निर्मीती, व विद्यापीठातील संशोधन कार्य याबाबत मार्गदर्शन करून
प्रशिक्षणाची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वरिष्ठ संशोधन सहाय्यक
श्री. धनंजय मोहोड यांनी केले तर आभार डॉ. पी. एस. नेहेरकर
यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. अनंत लाड, डॉ. जायवार,
पाणी व्यवस्थापन योजनाचे प्रभारी अधिकारी
डॉ. हरीश आवारी, ऊत्ती संवर्धन प्रयोगशाळेचे प्रभारी अधिकारी
डॉ. आनंद दौडे, डॉ.प्रविण घाडगे, डॉ. सदावर्ते आदीसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी आणि परभणी जिल्हयातील ४० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.