आतंरराष्ट्रीय मृदा निमित्त मृदा सप्ताहाचे आयोजन
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणी
यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय मृदा दिनाचे औजित्य साधुन दिनांक ३० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान मृदा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन सदर सप्ताहाचे
उदघाटन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा प्रा. डॉ. इन्द्र मणि हे होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणुन
सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख (मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र) डॉ.
प्रविण वैद्य, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुरेश वाईकर आदीची उपस्थिती होती.
मार्गदर्शनात कुलगुरू मा प्रा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, मानवी संस्कृती व जमिनीचा दर्जा, नदी काठच्या जमीनीची सुपीकता व नदीकाठी विकसित झालेले मानवी संस्कृती व त्यांचे अस्तित्व ठरलेली जमीन हा आधार दिवसंदिवस
प्रदुषीत होत आहे. शेतक-यांनी पीक पोषणातील विविध पैलू पैकी अन्नद्रव्यांचा उपसा व पुरवठा या मधील तफावत कमी करण्याचा प्रयत्न करावा. शेतकरी बांधवा उपयुक्त संशोधन झाले
पाहिजे. विद्यापीठातील
विविध प्रयोगशाळा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या पाहिजेत, असे सांगुन आंतरराष्ट्रीय मृदा दिना निमीत्त
आयोजीत उपक्रमाचे कौतुक केले. थायलंड
अभ्यास दौरा दरम्यान मृदा दिनादिवशी थायलंडाचा राजा
भुमिबोल यांच्या सन्मानार्थ सजलेल्या बँकॉक नगरीचे व नागरीकांमध्ये मातीविषयी असलेल्या
जागृकते अनुभव कथन केले.
प्रास्ताविकात डॉ. प्रविण वैद्य यांनी मृदा सप्ताह दरम्यान आयोजीत शेतकरी व विद्यार्थ्यांनमध्ये माती बाबत जनजागृती उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ सुरेश वाईकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. स्वाती झाडे डॉ. संतोष चिक्षे, डॉ. सुदाम शिराळे, डॉ स्नेहल शिलेवंत, श्री भानुदास इंगोले, श्री. अजय चरकपल्ली, शुभम गीरडेकर, प्रीया सत्वधर, श्री. बुद्धभुषण वानखेडे, श्री आंनद नंदनवरे, जोंधळे आदीसह विभागातील कर्मचा-यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विभागातील प्राध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी यांची उपस्थिती होती.