वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि परभणी आत्मा, कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालय (भारत सरकार), नवी दिल्ली पुरस्कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे भव्य आयोजन दिनांक २१, २२, आणि २३ फेब्रुवारी, २०२४ रोजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुल प्रागंणात करण्यात आले असुन आज दिनांक २२ फेब्रुवारी रोजी शेतकरी बांधव, कृषि विस्तारक, शास्त्रज्ञ, कृषि उद्योजक आणि विद्यार्थी यांनी उत्स्फुत प्रतिसाद दिला. कृषी प्रदर्शनीत सार्वजनिक संस्था, खासगी कंपन्या, अशासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गट यांच्या ३०० पेक्षा जास्त दालनाचा असुन पशु प्रदर्शन, कृषि औजारांचे प्रदर्शन, विविध शेती निविष्ठा, बी बियाणे आदींचा समावेश आहे. यावेळी आयोजित पशु प्रदर्शनीत विविध जातीचे पशुधन त्यात देशी गोवंश, देशी म्हैसवर्गीय जाती, शेळी, कुक्कट पालन, कुत्रांच्या विविध जाती, दुग्धजन्य पदार्थ, गांडुळ खत निर्मिती, विविध चारा पिके आदी दालनाचा समावेश आहे. कृषि औजारांच्या प्रदर्शनीत बैलचलित यंत्र, ट्रक्टर चलित यंत्र, आधुनिक सिंचन यंत्रणा, ठिंबक सिंचन, तुषार सिंचन, सुक्ष्म सिंचन आदींची समावेश आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या माध्यमातुन आयोजित खाद्य महोत्सवासही नागरीकांनी मोठी गर्दी केलेली पाहावयास मिळाली. दिनांक २३ फेबुवारी रोजी सदर कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचा शेवटचा दिवस असुन माननीय कृषीमंत्री मा ना श्री धनंजय मुंडे, कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि, पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक मा श्री रावसाहेब भागडे आणि मान्यवरांच्या उपस्थित समारोपीय कार्यक्रम होणार आहे.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA