वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालय येथे
केंद्र शासन साहिय्यीत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग खाद्य
प्रसंस्करण उद्योग मंत्रालय (भारत
सरकार) अंतर्गत सामाईक उष्मायन
केंद्र, (कॉमन इन्क्युबेशन सेंटर) ची उभारणी करण्यात आली आहे. त्या अंतर्गत आधुनिक
गुळप्रक्रिया प्रकिया संस्करणामध्ये ऊसाच्या रसापासून उत्तम प्रतीचा गुळ, पावडर,
गुळवडी व काकवी यासारख्या प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याचे प्रात्यक्षिक
चाचणीचे उदघाटन कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि व नवी दिल्ली येथील भारतीय
कृषि संशोधन संस्थेचे संचालक तथा कुलगुरू मा डॉ. ए. के. सिंग यांच्या शुभहस्ते दिनांक २२ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विभाग प्रमुख
डॉ. हिराकांत काळबांडे प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ.
राजेश क्षीरसागर, डॉ.
हेमंत देशपांडे, डॉ. सुरेंद्र सदावर्ते, डॉ. अनुप्रिता जोशी यांनी पश्चिम विभागीय
कृषि मेळावासाठी आलेल्या प्रगतशील शेतकरी, महिला बचत गट, नवउद्योजक यांच्या भेटी
दरम्यान गुळ प्रक्रिया तंत्रज्ञान व यंत्र सामग्री बद्दल माहिती दिली. या प्रसंगी
डॉ. वेदप्रकाश सुर्वे, डॉ. कैलास गाढे, डॉ. प्रविण घाटगे, डॉ. गिरीश माचेवाड, डॉ.
भारत आगरकर, डॉ. भानुदास पाटील, डॉ. भोकरे आदीसह विद्यालयातील कर्मचारी उपस्थित
होते.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA