मार्गदर्शनात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी शास्त्रज्ञांनी संशोधन करतांना न्यायीक बाबी या बाह्य स्वरूपाच्या असतात परंतु नीती आणि मूल्य हे स्वतःच्या अंतर्भूत बाबी आहेत. या बाह्य आणि अंतर्गत बाबी योग्य पद्धती शास्त्रज्ञांनी ओळखाव्यात आणि त्या दृष्टीने कार्य करावे. खरा शास्त्रज्ञ हा स्वतः झिजतो आणि समाजाला योग्य संशोधन देतो, असे त्यांनी नमूद केले.
प्रमुख वक्ते प्रा. आर. के. कोटनाला यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, परीक्षेमधील शैक्षणिक एकरूपता आणि नीती मूल्यांचा उपयोग करावा. भारतामध्ये उच्च दर्जेचे संशोधन विकसित होत आहेत, हरीत शक्ती, हायड्रोइलेक्ट्रिक सेल ची निर्मिती ही भारतासाठी गर्वाची बाब आहे. ज्ञानाचा योग्य वापर करून उद्योग, विक्री व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान विकासात नीती मूल्यांचे अवलंबन करण्याचा सल्ला त्यांनी दिला. शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या कार्यक्रमात विद्यापीठातील विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते.