वनामकृवित आयोजित संमिश्र शिक्षण पद्धतीवरील दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शिक्षण संचालनालय आणि नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या भारतीय कृषि सांख्यिकी संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ आणि २५ फेब्रवारी रोजी संमिश्र शिक्षण पध्दती (ब्लेंडेड लर्निंग) यावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (शिक्षण संचालक) डॉ. आर. सी. अग्रवाल, संगणक अनुप्रयोग विभागाचे प्रमुख डॉ सुदीप मारवा यांची आभासी माध्यमातुन तर व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माइल, प्राचर्या डॉ जया बंगाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांनी म्हणाले की, मर्यादीत मनुष्यबळावर प्रभावी शिक्षणाचे कार्य करण्यासाठी संमिश्र शिक्षण पद्धती हे शैक्षणिक विकासातील एक महत्त्वाचे पुढचे पाऊल आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आणि शैक्षणिक व्यवस्थेस मोठा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढ होण्यासाठी आभासी (ऑनलाइन) माध्यमातून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक वाढ होऊ शकते.
मार्गदर्शनात उपमहासंचालक डॉ. आर. सी. अग्रवाल म्हणाले की, नवीन शिक्षण पद्धतीमध्ये संमिश्र शिक्षण पद्धतीचे अनन्य असे महत्त्व असुन यामध्ये ४० टक्कया पर्यंत अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ॲग्रीदीक्षा, स्वयंम सारख्या आभासी माध्यमाद्वारे नियमित अभ्यासामध्ये मिश्रित करून पूर्ण करता येऊ शकतो. यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांना वेळेचे योग्य नियोजन करून उत्कृष्ट शिक्षणाची समान संधी सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे.
डॉ. सुदीप मारवा यांनी संमिश्र शिक्षण पद्धतीमध्ये असलेले वेगवेगळे पैलू समजावून सांगुन माध्यमाचा प्रभावीपणे उपयोग केल्यास विद्यार्थ्यांना अध्यायनाकरिता चांगला लाभ होणार असल्याचे सांगितले.
दोन दिवसीय कार्यशाळे प्रशिक्षक श्री तरूण खुराणा यांनी संमिश्र शिक्षण पध्दती सॉफ्टवेअर वर सविस्तर प्रशिक्षण दिले. प्रस्ताविकात संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांनी भविष्यात विद्यापीठांमध्ये संमिश्र शिक्षण पद्धतीचे प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हे विद्यापीठ पूर्णतः तयारी करत असल्याचे संबोधले. सूत्रसंचलन डॉ. मिर्झा बेग यांनी तर आभार समन्वयक डॉ. प्रवीण कापसे यांनी केले.
संमिश्र शिक्षण पद्धती म्हणजे खडू ,फळा आणि वर्ग खोल्या मध्ये शिकवणे यासोबतच आभासी (ऑनलाइन) माध्यमाचे मिश्रण करून शिकविणे होय. दोन दिवसीय कार्यशाळेत १५२ प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्याना यांना संमिश्र शिक्षण पद्धतीचे प्रशिक्षण दिले. समारोपीय कार्यक्रम शिक्षण संचालक डॉ उदय खोडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यशाळेत सहभागीतांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळा
यशस्वीतेकरिता संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सचिन
मोरे, डॉ. प्रवीण कापसे, डॉ. संतोष
फुलारी, डॉ रवि शिंदे,
डॉ भोसले, डॉ संतोष कदम,
डॉ एआयबी मिर्झा, डॉ डि के
झाटे, डॉ जी एम कोटे,
डॉ अनशुल लोहकरे आदीसह शिक्षण संचालनयाच्या कर्मचारी यांनी
परिश्रम घेतले.