वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि परभणी आत्मा, कृषि
विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तथा शेतकरी कल्याण
मंत्रालय (भारत सरकार), नवी दिल्ली पुरस्कृत पश्चिम
विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे भव्य आयोजन दिनांक २१, २२, आणि
२३ फेब्रुवारी, २०२४ रोजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुल
प्रागंणात करण्यात आले आहे. या निमित्त आयोजित तांत्रिक सत्रात विविध मान्यवरांनी
मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव मा श्री अनुप कुमार यांनी
पिक उत्पादकतेतील आव्हाने आणि कृषि विविधीकरणाची गरज यावर विशेष मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन मा श्री अनुप कुमार म्हणाले की, महाराष्ट्रातील
कापुस, सोयाबीन, बाजरी, मुग
पिकांची सरासरी उत्पादकता कमी असुन उपलब्ध साधनसंपत्ती नियोजनपुर्वक वापर करावा
लागेल. शेतीत केवळ उत्पादन वाढच नव्हे तर निव्वळ नफा वाढ महत्वाची आहे. शाश्वत
उत्पादनाकरिता पिक लागवडीच्या योग्य शिफारसी शेतकरी बांधवा दयावी लागतील. हवामान
बदलाचा मोठा परिणाम पर्जन्यमानावर होत असुन अनेक वेळा अतिवृष्टीचा मोठा फटका शेतक-यांना
बसला आहे. आपणास फळबाग आणि भाजीपाल लागवडीकडे वळावे लागेल. शेती शाळेच्या माध्यमातुन
शेतक-याना प्रशिक्षण दयावे, असे ते म्हणाले. तर लोकसभातुन
ग्रामीण विकास यावर पाटोदाचे माजी सरपंच श्री भास्कर पेरे पाटील म्हणाले की, किफायतशीर
शेतीसाठी पिकते तिथे विकले गेले पाहिजे. शेती उत्पादनावर प्रक्रिया होऊन शेतमाल ग्रामीण
पातळीवर किंवा आहेत तिथेच विक्री झाला पाहिजे. शेतकऱ्यांनी निसंकोचित आणि लाज न बाळगता
आपला माल स्वतः विक्री करावा असे त्यांनी आव्हान केले. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील
दुवा ग्रामपंचायतीनी व्हावे आणि शेतकऱ्यांचा माल विक्री करण्यासाठी विविध उपाय योजना
राबवाव्यात. पाच हजाराची टॅक्स घेऊन पंधरा हजाराच्या सुविधा देऊन सुद्धा २५ टक्के नफा
मिळवणारी पाटोदाची ग्रामपंचायत आहे. गावामध्ये चार प्रकारचे नळ आहेत एका मधून धुण्यासाठी
दुसर्यातून धरणाचे तिसऱ्यातून शुद्ध पाणी पिण्याचे आणि चौथ्या मधून पहाटे पाच ते सकाळी
आठ पर्यंत अंघोळीसाठी गरम पाण्याचे नळ आहेत. समाजाला योग्य शिकवण देण्याची गरज आहे.
काम करून घेण्याची कला प्रशासनाने आणि व्यक्तीने आत्मसात करणे आवश्यक आहे, असे
ते म्हणाले.
तांत्रिक सत्रात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि, नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ व्ही व्ही सदामते आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती. तांत्रिक सत्रात दिनांक २१ फेबुवारी रोजी शेतीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यावर डॉ व्ही एन काळे यांनी मार्गदर्शन केले तर शेतमालास आयात-निर्यातीमधील संधी यावर डॉ अमोल यादव यांनी, भरडधान्य प्रक्रिया व भरडधान्य पदार्थ यावर श्री महेश लोंढे यांनी मार्गदर्शन केले तर भरडधान्यांचे मुल्यवर्धन यावर श्री वीरशेट्टी पाटील यांनी मार्गदर्शन केले. दिनांक २२ फेब्रुवारी रोजी व्यापारीदृष्टीने सिताफळ लागवडावर डॉ एन एम कसपटे, गटशेतीव्दारे आंबा लागवडीवर डॉ बी एम कापसे, आंबा फळबाग व्यवस्थापनावर श्री चंद्रकांत वरपुडकर, रेशीम शेतीवर श्री अजय मोहिते, सिंचन पाणी व्यवस्थापन आणि कृषि पर्यटनावर डॉ सुरेश कुलकर्णी, कृषि पर्यटातील संधी यावर श्री मनोज हाडवळे तसेव दुपारच्या सत्रात नैसर्गिक शेतीतील अनुभव यावर कृषिभुषण श्री सुभाष शर्मा, नैसर्गिक शेतीवर श्री संतोष आळसे, सेंद्रीय शेतीतील अनुभव श्रीमती विद्याताई रूद्राक्ष, सेंद्रीय व नैसर्गिक शेतीतील संधी यावर डॉ ए एस राजपुत, जागर सेंद्रीय शेतीचा यावर श्री शिवराम घोडके, लोकसभातुन ग्रामीण विकास यावर श्री भास्कर पेरे पाटील यावेळ मार्गदर्शन केले.