भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली आणि वनामकृवि, परभणी यांच्या सामंजस्य करार
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्था यांच्यात दिनांक २२ फेब्रुवारी रोजी कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्याकरिता सामजंस्य
करार करण्यात आला. भारतीय कृषी संशोधन संस्थेचे माननीय संचालक डॉ ए के सिंग, वनामकृविचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव श्री पी के काळे, प्राचार्य डॉ राकेश आहिरे, डॉ डि के पाटील, डॉ एच व्ही काळपांडे, डॉ डी एस पेरके, डॉ किरण जाधव, डॉ गोदावरी पवार आदींची उपस्थिती होती.
यावेळी डॉ ए के सिंग म्हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ निर्मित तुर, सोयाबीन, ज्वारी, बाजरी पिकांच्या अनेक वाण अत्यंत उपयुक्त आहेत. या सामंजस्य करारामुळे दोन्ही संस्थेतील संशोधनास मदत होणार आहे. तर कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, भारतीय कृषि संशोधन संस्था ही देशातील एक अग्रगण्य संस्था असुन या करारामुळे परभणी कृषी विद्यापीठातील विद्यार्थी त्यांच्या संशोधनास मदत होणार आहे. दोन्ही संस्थेच्या माध्यमातुन अद्यायवत विषयावर विविध प्रकारचे अभ्यासक्रम एकत्रित राबविले जातील. शेतकरी यांच्या हितासाठी विविध तंत्रज्ञान व बियाणे यांचे देवाणघेवाण सोपे होईल. नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.