Sunday, March 10, 2013

जागतिक महिला दिनानिमित्‍त राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत हिमोग्लोबीन तपासणीचा अभिनव उपक्रम


महाविद्यालयीन युवतीची हिमोग्लोबीन तपासणी करतांना 

         अयोग्य आहारामुळे व हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे महिलांमध्‍ये विविध स्त्री रोंग होण्याचे प्रमाण वाढत आहे. विद्यार्थ्‍यानीनी अभ्यासासोबत आपल्या आहारावर व आरोग्यावर लक्ष दिल्यास सर्वागीण विकास होण्यास मदत होईल असे प्रतिपादन अन्न व आहार पोषण तज्ञ ङॉ आशा आर्या यांनी महिलाच्या आरोग्यासाठी आहारशास्त्राचे महत्व या विषयाचे मार्गदर्शन करतांना केले.
     येथील मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतंर्गत हिमोग्लोबीन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. अशोक कडाळे हे होते. तर प्रमुख पाहूण्या ङॉ आशा आर्य होत्या.
     रासेयो व्‍दारे राबविलेला हा उपक्रम निश्चितच स्तुत्य असून हा उपक्रम समाजात मोठया प्रमाणात सर्व महाविद्यालयांनी राबविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ.अशोक कडाळे यांनी केले.
     या शिबीरात एकुण 63 महाविद्यालयीन युवतीची हिमोग्लोबीन तपासणी झाली. या मध्ये 90 टक्के युवतीमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा कमी आढळून आले.
या कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमाधिकारी प्रा. रविंद्र शिंदे यांनी केले.  तर जिल्हा सामान्य रूग्णालयाचे श्री.साखरे, श्री अब्दुल तसेच मराठवाडा कृषि विद्यापीठाचे डॉ. सुब्बाराव, डॉ. स्मिता खोडके, प्रा. विवेकानंद भोसले प्रा. सुभाष विखे, प्रा. सौ प्रमोदिनी मोरे, प्रा. मधुकर मोरे, प्रा. संजय पवार, प्रा. आगरकर आदीचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात महाविद्यालयात युवा युवतींनी उत्स्फर्त सहभाग घेतला होता.