Tuesday, March 12, 2013

स्‍व.यशवंतराव चव्‍हाण: राजकारणातील राजहंस ............... डॉ अशोक ढवण

कृषिगंध या वार्षिक अंकाचे विमोचन



स्‍व.यशवंतराव चव्‍हाण धोरणी राजकारणासोबत ते साहित्‍यप्रेमी होते त्‍यांचे व्‍यक्‍तीमत्‍व हे अष्‍टपैलु होते, ते राजकारणातील राजहंस होते, त्‍यांचे भावविश्‍व युवापिठीस आजच्‍या काळातही प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी मराठवाडा कृषि विद्यापीठातील जिमखाना कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने स्‍व.यशवंतराव चव्‍हाण जन्‍मशताब्‍दीपुर्ती निमीत्‍त आयोजीत कार्यक्रमात मला भावलेले यशवंतराव या विषयावर व्‍याख्‍याना देतांनी केले. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन निवासी उपजिल्‍हाधिकारी श्री विश्‍वभंर गावंडे होते. तसेच कुलसचिव श्री का. वि पागिरे, अन्‍नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ सवत्‍धर, विद्यापीठ अभियंता श्री दिगांबर कोळेकर, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी त्‍याच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वावर यशवंतरावाच्‍या विचारांचा बालवयापासुन असलेला प्रभाव व त्‍यांच्‍या सानिध्‍यात आल्‍यानंतर भावलेले यशवंतराव या विषयी श्रोत्‍यांना मंत्रमुग्‍ध केले. प्रमुख पाहुणे निवासी उपजिल्‍हाधिकारी श्री विश्‍वभंर गावंडे म्‍हणाले कि, महाराष्‍ट्राच्‍या महसुल सहितानिर्मितीत व ग्रामविकासात यशवंतरावांचे अमुल्‍य असे योगदान आहे. त्‍यांनी तयार केलेले कायदयाच्‍या आधारे आज देशातील व राज्‍यातील पंचायतराज यंत्रणा चालु आहे. याचा समावेश संविधानातही करण्‍यात आला आहे. अध्‍यक्षीय समारोप डॉ एन डी पवार यांनी केला.
याप्रसंगी डॉ विलास पाटील यांना जेव्ही लीबींग या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केल्‍यानिमित्‍त प्रमुख पाहुण्‍यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. तसेच जिमखाना कृषि महाविद्यालयातर्फे प्रकाशित कृषिगंध या वार्षिक अंकाचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ विलास पाटील प्रास्‍ताविकात कृषि महाविद्यालयाच्‍या जिमखान्‍याच्‍या विध्‍यार्थासाठीच्‍या सांस्‍कृतीक, क्रिडा व सर्वकष व्‍यक्‍तीमत्‍व विकासातील योगदान थोडक्‍यात स्‍पष्‍ट केले. कार्यक्रमाचे सुत्रासंचालन डॉ हरिहर कौसडीकर तर आभार प्रदर्शन डॉ सुरेश वाईकर यांनी केले. व्‍याख्‍यानास मकृवितील सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्याथ्‍यीनी उपस्‍थीत होते.