राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी बांधव अत्यंत अडचणीत सापडला आहे. राज्यातील शेतकरी मुख्य केंद्रबिंदू मानून मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली असल्यामुळे विद्यापीठ शेतकऱ्याच्या प्रती असलेल्या बांधिलकीची जाण ठेऊन राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या मदतकार्यात खारीचा वाटा म्हणून मराठवाडा कृषि विद्यापीठातील सर्व संवर्गातील कर्मचारी, प्राध्यापक ते चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्यावतीने मुख्यमंत्री साहयनिधी त्यांच्या वेतनातून जमा झालेल्या रु १५ लाख रक्कमेचा धनाकर्ष दि १९ मार्च २०१३ रोजी मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांनी राज्याचे कृषीमंत्री मा ना श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत मुख्यमंत्री मा ना श्री पृथ्वीराजजी चव्हाण यांना सुपूर्द केला.
सध्याच्या दुष्काळ परिस्थितीशी लढा देण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीत दीर्घकालीन व तात्पुरते उपाययोजनेबाबत विद्यापीठ शास्त्रज्ञ मेळावा मार्फत मार्गदर्शन करीत आहेत. गेल्या दोन महिन्या पासून मोसंबीबागा वाचविण्यासाठी विद्यापीठ मोठी मोहीम राबवीत असून अनेक गावात शेतकरी मेळावे व चर्चासत्र घेण्यात आली आले आहेत. सर्व विद्यापीठ शास्त्रज्ञ, विस्तार कार्यकर्ते, कर्मचारी व विध्यार्थानी या परिस्थितीत विध्यापीठचे अनुकूल तंत्रज्ञान शेतकऱ्यान पर्यंत पोहचविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत असे आवाहन मा कुलगुरू यांनी केले.