Sunday, June 2, 2013

संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीच्‍या बैठकीत दहा नवीन वाणास मान्‍यतामहाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यापर्यंत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा  मानल्‍या जाणा-या संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची 41 वी बैठक नुकतीच परभणी येथे मराठवाडा कृषि विद्यापीठ संपन्‍न झाली. तीन दिवस झालेल्‍या शास्‍त्रज्ञांच्‍या या संशोधन समिती बैठकीत राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठांच्‍या एकुण 218 शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली. यामध्‍ये विविध दहा नवीन वाणास मान्‍यता देण्‍यात आली.
राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधीत केलेल्‍या सोयाबीनच्‍या फुले अग्रणी (केडीएस-344) हा अधिक उत्‍पादन  (25.24 क्विं प्रति हेक्‍टर)  देणारा  तसेच तांबेरा रोगास प्रतिकारक असणारा वाण राज्‍यात खरीप लागवडीसाठी प्रसारीत करण्‍यात आला तर भुईमुगाची फुले वारणा (केडीजी-128) हा अधिक उत्‍पादन (30.23 क्विं प्रति हेक्‍टर) देणारा निमपस-या वाण राज्‍यामध्‍ये खरीप हंगामात निमपस-या लागवड क्षेत्रासाठी प्रसारीत करण्‍यासाठी शिफारस करण्‍यात आली. तसेच  करडईचा फुले चंद्रभागा (एसएसएफ-748) या अधिक उत्‍पादन (बागायत 18.55 व जिरायत 11.84 क्विं प्रति हेक्‍टर) देणा-या वाणाची राज्‍यात लागवडीसाठी प्रसारीत करण्‍याची शिफारस करण्‍यात आली तर हिरव्‍या चा-यासाठी राज्‍यातील बागायती भागात उच्‍च दर्जाच्‍या हिरव्‍या चा-याच्‍या अधिक उत्‍पादनसाठी (585.05 क्विं प्रति हेक्‍टर) बहुवार्षिक मारवेल गवताच्‍या फुले गोवर्धन (मारवेल 2008-1) वाणाची प्रसारीत करण्‍यात आले. तसेच ज्‍वारी एसपीव्‍ही-2057 (आरएसएसव्‍ही-167) या अधिक उत्‍पादन देणारा (443.4 क्विं प्रति हेक्‍टर) हा वाण खरीप हंगामासाठी महाराष्‍ट्रासह राजस्‍थान, हरियाणा, पंजाब, उत्‍तराखंड, उत्‍तरप्रदेश, कर्नाटक व तामिळनाडु या प्रदेशासाठी एककापणीकरता प्रसारीत करण्‍यात आला.
परभणी येथील मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कापसाच्‍या दोन व काबुली हरभराचा एक वाणाची शिफारशींना मान्‍यात देण्‍यात आली. काबुली हरभरा बीडीएनजीके-798 राज्‍यात लागवडीसाठी शिफारस करण्‍यात आला. हा वाण राज्‍यात तुल्‍यबळ वाण विराट, काक-2, पीकेव्‍हीके-4 आणि कृपापेक्षा बीडीएनजीके-798 या वाणने जास्‍त उत्‍पादन दिल्‍याचे आढळुन आले असुन मर रोगास प्रतिकारक्षम आढळुन आल्‍यामुळे या वाणाची राज्‍यात लागवडीसाठी शिफारस करण्‍यात आली. तसेच कापुस या पिकाचा अमेरिकन संकरीत वाण एनएचएच-206 हा अधिक उत्‍पादन देणारा, धाग्‍याची उच्‍च गुणवत्‍ता असलेला व तुडतुडया करीता प्रतिकारक वाण राज्‍यातील कोरडवाहु लागवडीसाठीची शिफारस करण्‍यात आली तर देशी कापसाच्‍या पीए-528 हा वाण तुल्‍यवाणापेक्षा अधिक उत्‍पादन देणारा असुन सरस धागा, रसशोषक किडी, बोंडअळी, कडा करपा व दहिया रोगास सहनशील असुन हा वाण मराठवाडा विभागातील मध्‍यम जमिनीसाठी शिफारस करण्‍यात आली आहे.
फळपिकांमध्‍ये महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधीत केलेले डाळिंबाचे वाण फुले भगवा सुपर (सिलेक्‍शन-4) हा वाण जास्‍त उत्‍पादन क्षमता, गर्द केशरी रंग, फळांचा मध्‍यम आकार, चकाकरणारी जाड साल गर्द लाल रंगाचे टपोरे रसाळ दाणे अशा वैशिष्‍टपुर्ण गुणधर्म असणा-या निवड पध्‍दतीने विकसीत केलेल्‍या या वाणाची राज्‍यात लागवडीसाठी प्रसारीत करण्‍यात आली आहे.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषि विद्यापीठाने संशोधीत केलेल्‍या कोथींबीरींचा कोकण कस्‍तुरी (DPL-COR.1) हा वाण अधिक उत्‍पादन व सुगंधी वास असणारा वाण कोकण विभागात रब्‍बी व उन्‍हाळी हंगामामध्‍ये लागवडीसाठी प्रसारीत करण्‍यात आला आहे.
यात 12 विविध पिकांचे वाण, 9 शेती औजारे व यंत्रे तसेच 197 इतर तंत्रज्ञान शिफारशीचा समावेश आहे. मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या एकुण 44 शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली. यात 3 शेतपीके वाण, 5 शेती यंत्रे व औजारे व 36 इतर तंत्रज्ञान शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली.
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कापसाच्‍या दोन व काबुली हरभराचा एक वाणाची शिफारशींना मान्‍यात देण्‍यात आली. काबुली हरभरा बीडीएनजीके-798 राज्‍यात लागवडीसाठी शिफारस करण्‍यात आला. हा वाण राज्‍यात तुल्‍यबळ वाण विराट, काक-2, पीकेव्‍हीके-4 आणि कृपापेक्षा बीडीएनजीके-798 या वाणने जास्‍त उत्‍पादन दिल्‍याचे आढळुन आले असुन मर रोगास प्रतिकारक्षम आढळुन आल्‍यामुळे या वाणाची राज्‍यात लागवडीसाठी शिफारस करण्‍यात आली. तसेच कापुस या पिकाचा अमेरिकन संकरीत वाण एनएचएच-206 हा अधिक उत्‍पादन देणारा, धाग्‍याची उच्‍च गुणवत्‍ता असलेला व तुडतुडया करीता प्रतिकारक वाण राज्‍यातील कोरडवाहु लागवडीसाठीची शिफारस करण्‍यात आली तर देशी कापसाच्‍या पीए-528 हा वाण तुल्‍यवाणापेक्षा अधिक उत्‍पादन देणारा असुन सरस धागा, रसशोषक किडी, बोंडअळी, कडा करपा व दहिया रोगास सहनशील असुन हा वाण मराठवाडा विभागातील मध्‍यम जमिनीसाठी शिफारस करण्‍यात आली आहे.