वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या
तण विज्ञान संशोधीत केंद्राच्या वतीने पिंगळी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गाजर
गवत जनजागृती सप्ताहानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तण
विज्ञानाचे प्रभारी डॉ. अशोक जाधव यांनी उपस्थितांना गाजर गवत निर्मुलनाबद्दल
सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी
शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे कृषिदुत
यांनी रॅलीत भाग घेतला. विद्यार्थ्यांना गाजर गवत निर्मुलनाबाबतची माहिती पत्रके
वाटली. शाळेसमोरील भिंतीवर फिती पत्रके लावुन गावक-यांना माहिती देण्यात आली. यशस्वितेसाठी
कृषिदूत व जिल्हा परिषद शाळेचे श्री कदम
सर यांनी विशेष परिश्रम घेतले