वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत
असलेल्या अन्नतंत्र महाविद्यालयात अनुभवाधारीत शिक्षण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक-खासगी
भागीदारी प्रकल्पास विद्यापीठ कार्यकारी
परिषदेचे सदस्य तथा आमदार मा श्री माधवराव पवार जवळगावकर यांनी सदिच्छा भेट
दिला. या प्रसंगी विद्यापीठाचे
मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ व्ही एन पवार व उद्योजक श्री मोहम्मद गौस यांनी प्रकल्पाची
व विविध प्रक्रिया पदार्थाची सविस्तर माहिती दिला.
मा श्री पवार यांच्या हस्ते प्रकल्पात
उत्पादीत केलेल्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या पदार्थाच्या माहिती पत्रकाचे
विमोचन करण्यात आले. या प्रसंगी मा श्री माधवराव पवार म्हणाले की, अन्नतंत्र महाविद्यालयातील हा सार्वजनिक-खासगी
भागीदारी प्रकल्प निश्चितच प्रसंशनीय असुन यामुळे या भागातील उद्योजकता विकासास निश्च्िातच
चालना मिळेल. या प्रकल्पात ग्रामीण भागातील युवकांना देखिल लघु प्रशिक्षणाची सोय
करण्यात यावी, जेणे करून ग्रामीण युवकांना शेती माला प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची
प्रेरणा मिळेल, असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता
डॉ विश्वास शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद
वासकर, प्रा. दिलीप मोरे, प्रा सयद हश्मी उपस्थित होते.