विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे दि 31 जुलै रोजी सेवानिवृत्त
झाले त्यानिमित्य त्यांचा सपत्नीक सत्कार करतांना विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ किशनराव
गोरे, शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद
वासकर, कुलसचिव श्री का वि पागीरे व सौ खंडागळे
वसंतराव नाईक कृषि
विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे दि 31 जुलै रोजी सेवानिवृत्त
झाले त्यानिमित्य त्यांचा सपत्नीक सत्काराचा कार्यक्रम संशोधन संचालनालयाच्या
वतीने आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे
कुलगूरू मा डॉ किशनराव गोरे होते तर शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास
शिंदे, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का वि पागिरे, सौ
खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात मा
कुलगूरू म्हणाले की, डॉ खंडागळे यांचे यांनी 38 वर्ष विद्यापीठाची सेवा केली, या
त्यांच्या प्रदिर्घ सेवेकाळात केलेले काम व संशोधनराचे कार्य हे विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना
प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाचे महत्वाचे संशोधनाचे
कार्यासह संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीची बैठक यशस्वीतेपणे पार पडली असे
गौरवौद् गार काढले. सत्काराला उत्तर देतांनी डॉ.
गोवर्धन खंडागळे म्हणाले की, विद्यापीठातील सर्व कर्मचा-यांच्या सहकार्यानी मला
विद्यापीठाची सेवा यशस्वीपणे पार पाडता आली. विशेषत: सोयाबीन व कापूस पैदासकार,
विभाग प्रमुख, बदनापुर येथे कृषि महाविद्यालयास सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य
तसेच संशोधन संचालक या पदावर यशस्वीपणे काम करता आले.
याप्रसंगी नवनियुक्त
संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. विश्वास
शिंदे , कुलसचिव श्री का. वी. पागीरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संशोधन उपसंचालक डॉ ए एस
कारले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन श्री उदय वाईकर तर आभार
प्रदर्शन श्री जी बी उबाळे यांनी केले. या प्रसंगी नवनियुक्त संशोधन संचालक डॉ
दत्तप्रसाद वासकर यांचा सत्कार मा. कुलगूरू यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ जी के लोंढे, श्री आर व्ही नवगिरे, श्री के बी फाजगे
व संशोधन संचालनालयाच्या कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सहयोगी अधिष्ठाता
डॉ डि बी देवसरकर, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ एन डी
पवार, गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या प्रा विशाला
पटणन, गोळेगांव येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ व्ही
डी पाटील, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी डॉ उदय खोडके, उद्यानविद्या
महाविद्यालयाचे प्रभारी डॉ रोहीदास, तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी वर्ग
मोठया संख्येने उपस्थित होते.