वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातंर्गत असलेल्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या
राष्ट्रिय सेवा योजना मार्फत सहयाद्री वसतीगुहाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी महाविदयालयाच्या
सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी स्वच्छतेचे महत्व सांगताना
म्हणाले की, वैयक्तीक स्वच्छता व परीसर स्वच्छता ही मानवाच्या आरोग्याच्या
दृष्टिने महत्वाची बाब असुन सामाजिक बांधिलकी म्हणुन स्वयंसेवक व स्वंयसेविकांनी
याचा प्रचार करावा. विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्वंयसेवक विशाल
काळे तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा रवीद्र शिंदे यांनी केले.
या स्वच्छता मोहीमेतंर्गत सहयाद्री
वसतीग़हाच्या परिसरातील गाजरगवत, तण, कचरा प्लास्टीक इत्यादीची योग्य विल्हेवाट
लावण्यात आली. याप्रसंगी प्रा. सौ. स्मिता खोडके, प्रा. विवेकानंद भोसले, प्रा.
भुईभार, प्रा. आवारी, प्रा. मुंढे, प्रा. जाधव, प्रा. सुभाष विखे, प्रा.जी.यु.शिंदे,
प्रा. प्रमोदीनी मोरे, प्रा. संदीप पायल, प्रा. टेकाळे, प्रा. देशमुख, श्री. संजय पवार, श्री वाघमारे, श्री राउत, श्री
शिवणकर यांच्यासह राष्ट्रिय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वंयसेविकां मोठया संख्येने
उपस्थित होते.