Tuesday, October 8, 2013

जलालपुर येथील शेतकरी मेळाव्‍यास प्रतिसाद


      वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालय, परभणी येथील ज्‍वार संशोधन केंद्रांच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभवांतर्गत दिनांक 07.10.2013 रोजी मौजे जलालपुर ता.जि. परभणी येथे शेतकरी मेळावा घेण्‍यात आला. मेळाव्‍यास प्रमुख पाहुणे म्‍हणून कृषि तंत्रज्ञान आणि माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे तर प्रतिष्‍ठीत नागरीक डॉ. बाळासाहेब जटाळ अध्‍यक्षस्‍थानी होते.
      डॉ. आनंद गोरे यांनी रब्‍बी लागवड तंत्रज्ञान यावर तर पशुधन विकास अधिकारी डॉ. पि. डी. सावणे यांनी जनाव-यांचे आजार व प्रतिबंधत्‍मक उपाय याविषयी मार्गदर्शन केले. तसेच कीड व्‍यवस्‍थापनावर डॉ. डी डी पटाईत यांनी तर कार्यक्रम अधिकारी प्रा. खोब्रागडे यांनी ज्‍वार लागवडीवर शेतक-यांनी मार्गदर्शन केले.
     कार्यक्रम घेण्‍यासाठी सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य मा. डॉ. एन. डी. पवार, ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे सहसमन्‍वयक तथा विभाग प्रमुख मा. डॉ. बी. एम. ठोंबरे, ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रभारी डॉ. आर. पी. कदम अधिकारी ह्यांचे मार्गदर्शन लाभले. मेळावास शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. मेळावा यशस्‍वीतेसाठी कृषिदुतांनी परिश्रम घेतले.