Tuesday, October 22, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला

भारतीय हवामान विभागमुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये पुढील आठवडयात आकाश अंशतः ढगाळ राहील. औरंगाबाद व उस्‍मानाबाद जिल्‍हयात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २७.० ते ३४.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान १७.० ते २२.० अंश सेल्‍सीअस राहील. वारा ताशी ६.० ते १२.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५८.० ते ९९.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३.० ते ७९.० टक्‍के राहील.

विशेष सुचना या आठवडयात  आकाश अंशतः ढगाळ राहील.

शेतकरी बांधवाना कृषि सल्‍ला

कापूस

तुडतुडे, पांढरी माशी, दहिया, लाल्‍या  
कापूस पिकात तुडतुडे, पांढरी माशी, दहिया व लाल्‍या रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. तुडतुड्यांचे निरूंत्रणासाठी असिटामेप्रीड २० टक्‍के २ ग्रॅम किंवा मिथिलडिमेटॉन २५ टक्‍के ८ मिली, पांढरी माशीचे नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस ४० टक्‍के २० मिली किंवा असिफेट ७५ टक्‍के २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी दहीया रोगाच्‍या नियंत्रणासाठी पाण्‍यात विरघळणारा गंधक २५ ग्रॅम तर लाल्‍या रोगाच्‍या नियंत्रणासाठी मॅग्‍नेशियम सल्‍फेट अधिक पोटॅशियम नायट्रेट प्रत्‍येकी ४० ग्रॅम प्रत्‍येकी प्रती दहा लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.  
तुर

तुरीचे पिक गाठी धरण्‍याच्‍या अवस्‍थेत आहे. शेंगा पोखरणारी अळी पिसारी पतंग व शेंगमाशी यांचा प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणून फुलकळीच्‍या अवस्‍थेत ५ टक्‍के निंबोळी अर्क अधिक १ टक्‍का साबनेचा चुरा अधिक क्विनॉलफॉस २५ टक्‍के १६ मिली प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.
उस

पूर्व हंगामी ऊसाची लागवड १५ नोव्‍हेंबर पर्यंत पुर्ण करावी. लागवडीसाठी को-८६०३२ (निरा), को-९४०१२, को.सी.६७१, को-८०१४, को.९९००४, या वाणांचा वापर करावा. ऊसाचे बेणे जाड रसरशीत, डोळे जोमदार व फुगीर असावेत, बेण्‍याचे वय ०९ ते ११ महिन्‍याचेअसावे. किड व रोगमुक्‍त बेण्‍याचा वापर करावा. लागवडी पूर्वी बेणे मॅलॅथिऑन ३०० मिली व बाविस्‍टीन (१०० ग्रॅम) १०० लिटर पाण्‍याच्‍या द्रावणात १० ते १५ मिनीटे बुडवून घ्‍यावे.
आंबा

आंब्‍यावर तुडतुडे आढळल्‍यस सांयपरमेथ्रीन २५ ईसी ३ मिली किंवा फेनवलरेट २० ईसी ५ मीली १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारावे.तसेच भुरी रोग आढळल्‍यास कार्बेंडायझीम १० ग्रॅम १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. बागेमध्‍ये तुट आढळुन आल्‍यास दुसरे रोप लावुन तुट भरून काढावी. सिंचन सुविधा उपलब्‍ध असल्‍यस रब्‍बीची अंतरपीके घ्‍यावीत. झाडास आळे करून घ्‍यावीत. 
संत्रा मोसंबी
बुरशीजन्‍य रोग
संत्रा/मोसंबीचे बागेत बुरशीजन्‍य रोगांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्‍याचे नियंत्रणसाठी १ टक्‍के बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.
पेरू

पेरूच्‍ बागेत फळमाशीच्‍या नियंत्रणसाठी मीथीलयुजेनॉलयुक्‍त सापळे हेक्‍टरी ५ या प्रमाणात लावावेत.
अंजीर
तांबेरा
बागेत पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्‍यावी. तसेच शेंडेमर आढळल्‍यसा रोगग्रस्‍त फाद्या काढून त्‍या ठिकाणी बोर्डेपेस्‍ट लावावे.
सिताफळ
काढणी अवस्‍था
पक्‍व फळांची काढणी करावी. प्रतवारी करून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावे.
कागदीलिंबु
देवीरोग
पाने खाणारी अळीचा प्रादूर्भाव बागेत आढळल्‍यास क्विनॉलफॉस २० मिली १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारावे. 
फुलशेती

गुलाबावर भुरी रोग आढळलयास डायफॅन्‍कॅनाझोल ०.०५ टक्‍के या बुरशीनाशकाची दर आठ दिवसाच्‍या अंतराने फवारणी करावी. निशिगंधाच्‍या पानावर ठिपके व करपा रोग आढळल्‍यास झायरम ०.३ टक्‍के किंवा डायथेन एम-४५ -०.२५ टक्‍के या बुरशीनाशकाची फवारणी करावी.
पशुधन व्‍यवस्‍थापन  : जनावरांना खुरकुत रोगाची लस टोचुन घ्‍यावी.


सौजन्य 
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषि हवामान सल्‍ला सेवा योजना


हवामानशास्‍त्र विभाग, वनामकृवि, परभणी
पञक क्रमांकः ५४
दिनांकः २२.१०.२०१३