Tuesday, October 1, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला पञिका

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये पुढील आठवडयात आकाश ढगाळ राहून तुरळक हलका ते मध्‍यम स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २६.० ते ३३.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान २०.० ते २३.० अंश सेल्‍सीअस राहील. वारा ताशी ९.० ते १९.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९०.० ते ९६.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८.० ते ८५.० टक्‍के राहील.

विशेष सुचना या आठवडयात  आकाश ढगाळ राहुन तुरळक ठिकाणी हलका ते मध्‍यम स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे.

शेतकरी बांधवाना कृषि सल्‍ला

कापूस

कापूस पिकावर फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी व लाल कोळी या रस शोषण करणा-या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्‍यांच्‍या नियंत्रणासाठी फेनप्रोपथ्रिन १० ई.सी. १० मिली किंवा बुप्रोफेझीन २५ टक्‍के १० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. मागील आठवडयातील काळात झालेल्‍या पावसामुळे सखल भागातील जमिनीत कापसाची झाडे उमळत आहेत. अशा झाडांना कॉपरऑक्‍सीक्‍लोराईड २५ ग्रॅम किंवा कार्बेन्‍डाझीम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन २५० ते ३०० मिली द्रावणाची चिबंवणी प्रति झाड केल्‍यास उमळण्‍याचे प्रमाण कमी होईल.        
तुर
तुरीचे पीक सखल भागातील जमिनीत उमळत आहेत. अशा जमिनीत वापसा येताच कोळपणी करावी. म्‍हणजे उमळण्‍याचे प्रमाण कमी होईल.
खरीप ज्‍वारी
खरीप ज्‍वारीचे पीक दाणे  भरण्‍याच्‍या अवस्‍थेत आहे. पिकाचे पक्षापासुन संरक्षणासाठी पिकात बेगडी पटया बांधाव्‍यात.
उस
पुर्व हंगामी उसाचे लागवडीसाठी जमिनीची निवड करून मशागतीची कामे पुर्ण करून जमिन तयार करावी. पुर्व हंगामी उसाची लागवड १५ ऑक्‍टोंबर ते १५ नोव्‍हेंबर या काळात करावी.
आंबा
बागेत पाने खाणा-या अळीचा प्रादूर्भाव दिसून आल्‍यास क्विनॉलफॉस २५ टक्‍के २० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
संत्रा मोसंबी
बागेत तुट आढळुण आल्‍यास तुट भरून काढावी. सिंचन सुविधा असल्‍यास बागेमध्‍ये रब्‍बीची आंतरपिके घेवु शकता बाग तणविरहीत ठेवावी.
अंजीर
३-४ खोडे ठेवून १५ ऑक्‍टोबर पर्यंत छाटणी केल्‍यास फायदेशीर आहे. अंजीरावर तांबेरा रोगाच्‍या नियंत्रणासाठी क्‍युलोरोथॅलोनील २० ग्रॅम २ ग्रॅम अधिक कार्बेन्‍डाझीम ७ ग्रॅम प्रति लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
सिताफळ
पिठया ढेकणाचा (मिलीबग) चा प्रादूर्भाव आढळल्‍यास त्‍याच्‍या नियंत्रणासाठी मॅलेथीऑन ५० टक्‍के प्रवाही १० मिली किंवा फॉस्‍पोमीडॉन ३ मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. पक्‍व फळांची काढणी करावी.
कागदीलिंबु
पाने खाणारी अळीचा प्रादूर्भाव दिसल्‍यास क्विनॉलफॉस २० मिली किंवा डायमिथोएट २० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. तसेच शेंडामर दिसून आल्‍यास रोगग्रस्‍त फांदया काढून त्‍यावर बोर्डोपेस्‍ट लावावे.
फुलशेती
झेंडुवर रसशोषण करणा-या किडीचा प्रादूर्भाव आढळुण अल्‍यास डायमेथोएट १० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. जिलारडीया, गुलाब इत्‍यादी फुलपिकांची लागवड करावी. 


  
सौजन्य 
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषि हवामान सल्‍ला सेवा योजना
हवामानशास्‍त्र विभाग, वनामकृवि, परभणी
पञक क्रमांकः ४८                                              
दिनांकः ०१.१०.२०१३