Wednesday, October 2, 2013

वसंतराव नाईक कृषि विद्यापीठास अखंडीत वीज पुरवठयासाठी द्रुतगती वाहीनी कार्यान्‍वीत



वसंतराव नार्इक कृषि विद्यापीठ कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍ताराचे कार्य केल्‍या जाते. मराठवाडा विभागासाठी स्‍थापन झालेल्‍या या कृषि विद्यापीठास विद्युत विषयक अनेक समस्‍यामुळे शैक्षणिक व संशोधन कार्यात सतत अडचणी निर्माण होत. विद्यापीठ हे दरमहा मोठी विद्युत देयके भरणारा विद्युत ग्राहक आहे. विद्यापीठ परिसरात विविध महाविद्यालये, प्रयोगशाळा, संशोधन योजना, बीजोत्‍पादन प्रक्षेत्र, कृषि प्रात्‍यक्षिक प्रक्षेत्र, उती संवर्धन केंद्र आदी महत्‍वाच्‍या आस्‍थापना व संशोध्‍न केंद्रे असुन या विविध शैक्षणिक व संशोधनात्‍मक कार्यासाठी अखंडीत वीज पुरवठयाची गरज असते. परंतु अलिकडे विद्युत वितरण कंपनीव्‍दारे भार नियमनात वाढ केल्‍याने या कार्यात व्‍यत्‍यत येत असे. विशेषता बीजोत्‍पादनात अडचणी येतात, पर्यायाने शेतक-यांना चांगले वाणाचे बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्‍ध करणे विद्यापीठास शक्‍य होत नसे तसेच शिक्षण व संशोधनाच्‍या कार्यात अडचणी निर्माण होत होत्‍या. विद्यापीठास अखंडीत व योग्‍य दाबाने विद्युत पुरवठा करण्‍यासाठी द्रुतगती विद्युत वाहीनी (एक्‍सप्रेस फीडर) मिळण्‍यासाठी महावितरण कंपनीस विद्यापीठाने विनंती केली. तसेच महाराष्‍ट्र राज्‍य कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा ना श्री विजयरावजी कोलते यांनी महाराष्‍ट्र राज्‍याचे उप मुख्‍यमंत्री व वित्‍त व नियोजन मंत्री मा ना श्री अजितदादा पवार यांना विनंती केली होती.
महावितरण कंपनीने त्‍यांच्‍या अभियंत्‍या मार्फत सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार केले व‍ त्‍याच्‍या दरपत्रकाचा भरणा विद्यापीठामार्फत विद्युत कंपनीस करण्‍यात आला. त्‍यानंतर विद्युत कंपनीने हे काम हाती घेवुन पुर्ण केलेले आहे. आज राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादुर शास्‍त्री यांच्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधुन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ किशनरावजी गोरे व जिल्‍हाधिकारी मा श्री सचिन्‍द्र प्रताप सिंह यांच्‍या हस्‍ते द्रुतगती वाहीनीची कळ दाबुन कार्यान्‍वीत करण्‍यात आली. याप्रसंगी महावितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता श्री सुरेश गणेशकर, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का वि पागिरे, विद्यापीठ अभियांता श्री अब्‍दुल रहीम, उपाभियंता श्री उल्‍हास खंबायतकर, महावितरण कंपनीचे उपाभियंता श्री पैठणकर, कनिष्‍ठ अभियंता श्री महेश जोशी, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. याप्रसंगी अधिक्षक अभियंता श्री सुरेश गणेशकर यांना या कामाबाबतचा रूपये सात लाखाचा धनादेश मा जिल्‍हाधिकारी मा श्री सचिन्‍द्र प्रताप सिंह यांच्‍या हस्‍ते देणात आला.
या वाहीनीमुळे पहिल्‍या टप्‍प्‍यात विद्यापीठाच्‍या परिसर क्रमांक तीन मधील कृषि प्रात्‍यक्षिक प्रक्षेत्र, कृषि तंत्रज्ञान माहीती केंद्र, विद्यार्थी वसतीगृहे, प्रशासकीय इमारत, पाणी पुरवठा, पथदिवे इत्‍यादींना अखंडीत विद्युत पुरवडा मिळणार आहे. तसेच दुस-या टप्‍प्‍यात विद्यापीठ परीसर क्रमांक एक व दोन करीताही द्रुतगती वाहिनीची आवश्‍यता असुन त्‍यासाठी विद्यापीठ प्रयत्‍नशील आहे.