Wednesday, March 12, 2014

कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या सौर फवारणी सयंत्रास प्रग्‍या 2014 मध्‍ये प्रथम पारितोषिक


राष्ट्रिय स्‍तरावरील अभियांत्रिकी स्‍पर्धा टेकनिकॅल फिस्‍टा प्रग्‍या 2014 चे आयोजन नांदेड येथील श्री गुरूगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्‍थेतर्फे दिनांक 7 ते 9 मार्च दरम्‍यान करण्‍यात आले होते. या स्‍पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यीनी विकसित केलेल्‍या सौर फवारणी सयंत्राने कृषि टेक गटात प्रथम पारितोषिक प्राप्‍त केले. हा प्रकल्‍प रोशनकुमार, अंकितकुमार, काजल भताने, नुतन नाईक व आनंदा हांडे या विद्यार्थ्‍यानी प्रा. संजय पवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली सादर केला होता. समारोपाच्‍या दिवशी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ट्रॅाफी, प्रशस्‍तीपत्र व रोख रक्‍कम विद्यार्थ्‍यांना प्रदान करण्‍यात आले. या निमित्‍त महाविद्यालयाचे सहयोगी अधि‍ष्‍ठाता डॉ उदय खोडके व विभाग प्रमुख प्रा विवेकांनद भोसले यांनी प्रा संजय पवार व विद्यार्थ्‍याचे अभिनंदन केले.