महाराष्ट्र शासनाच्या कोरडवाहु शेती अभियांनातर्गत कृषि
विद्यापीठातील शास्त्रज्ञ व शासनाच्या कृषि विभागातील अधिकारी यांची दोन दिवशीय
कार्यशाळा दि. २४ व २५ एप्रिल रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात होणार
असुन या कार्यशाळेचे उदघाटन दि. २४ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता महाराष्ट्र
राज्याचे अपर मुख्यसचिव (कृषि
व पणन) मा. डॉ सुधीरकुमार गोयल यांच्या हस्ते होणार आहे. या बैठकीस कृषि
आयुक्त मा. डॉ. उमाकांत दांगट, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे माजी कुलगुरू तथा
अभियानाचे मार्गदर्शक मा. डॉ. आर. बी. देशमुख व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ, परभणीचे
कुलगुरू मा. डॉ. वेंकटेश्वरलु यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दोन दिवस
होणा-या या कार्यशाळेत महाराष्ट्रातील कोरडवाहु शेती तंत्रज्ञानाची सध्य:स्थिती, सरंक्षीत लागवड व मुल्यवर्धन, हवामान बदल, आपत्कालीन पीक नियोजन व
एकात्मिक शेती पध्दती, शेतीतील पाणी व्यवस्थापनाचे यांत्रिकीकरण तसेच खरिप २०१४
हंगामाचे नियोजन, बियाणे
उपलब्धता व कोरडवाहु शेती तंत्रज्ञान आदी विषयांवर राज्यातील विविध क्षेत्रातील
तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्यानुसार कोरडवाहु शेती अभियानातंर्गत राबविण्यात
येणारे तंत्रज्ञान निश्चित करून ते राज्य शासनास हस्तांतरित करण्यात येणार
असल्याचे कार्यशाळेचे आयोजक तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी
सांगितले आहे.