गृह विज्ञान महाविद्यालयातील अनोखा उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या गृह
विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास विभाग व अन्न आणि पोषण विभागातर्फे दिनांक 7
मार्च रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त कर्मचारी व विद्यार्थ्यांनी
स्वत:तील शारीरिक व मानसिक उणिवां गुप्तता राखुन कागदावर मांडल्या व त्या उणिवांची
होळी करण्यात आली. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचा-यांच्या वजनाची नोंद
घेऊन आदर्श शारीरिक वजनासाठी योग्य ती काळजी घेण्याचा दृढ संकल्प करण्यात आला.
हा कार्यक्रम प्राचार्या प्रा. विशाला पटनम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात
आला. याप्रसंगी धारवाड (कर्नाटक) येथील अन्न व पोषण विभागाच्या विभाग प्रमुख डॉ पुष्पा
भारती, डॉ विजया नलवडे व महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.