Tuesday, December 2, 2014

एडस रोगाचे समुळ उच्‍चाटनासाठी युवकांनी पुढाकार घ्‍यावा .....शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण

कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्‍त चित्र प्रदर्शनीचे आयोजन

जागतिक एडस दिनानिमित्‍त कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना शिक्षण सचालक डॉ अशोक ढवणव्‍यासपीठावर प्राचार्य डॉ उदय खोडकेजिल्‍हा कार्यक्रम अधिकारी डॉ देवेंद्र लोलगेवैद्यकीय अधिकारी डॉ मंजुषा कुलकर्णीवैदयकीय अधिकारी डॉ सुब्‍बाराव आदी.

********************************************
जागतिक एड्स दिनानिमित्‍त कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्‍ट्रीय सेवा योजनेतंर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तर कार्यक्रमास प्राचार्य डॉ उदय खोडके, जिल्‍हा कार्यक्रम अधिकारी डॉ देवेंद्र लोलगे, वैद्यकीय अधिकारी डॉ मंजुषा कुलकर्णी, वैदयकीय अधिकारी डॉ सुब्‍बाराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य गेटिंग टू झिरो”  म्‍हणजेच नवीन एचआयव्ही संसर्ग होऊ द्यायचा नाही, कलंक व भेदभाव शून्यावर आणणे व एड्सने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणणे. शून्य गाठण्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सामाजिक व वैयक्तिक पातळीवर जबाबदारी घेऊन सातत्याने सर्वांनी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. समाजातुन एड्स रोगाचे समुळ उच्‍चाटनासाठी महाविद्यालयीन जीवनात एड्स विषयी प्रबोधन होणे आवश्‍यक असुन युवकांनी या रोगाबाबत माहिती घेऊन समाजात जागृतीसाठी पुढे यावे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला. कार्यक्रमात प्राचार्य डॉ उदय खोडके, जिल्‍हा कार्यक्रम अधिकारी डॉ देवेंद्र लोलगे व वैद्यकीय अधिकारी डॉ मंजुषा कुलकर्णी आदींनीही एड्स रोगाबाबत मार्गदर्शन केले. एड्स जनजागृती चित्र प्रदर्शन मार्फत व लोकशाहीर प्रकाश कांबळे यांनी आपल्‍या शाहीरीच्‍या माध्‍यमातुन एड्स रोगाबाबत प्रबोधन करण्‍यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्‍वयंसेविका नुतन नाईक तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा रविंद्र शिंदे यांनी केले.  कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी स्‍वयंसेवक अक्षय प्रधान, पंकज खंदारे, बालाजी गोडंगे, आर्शद शेख, रूपेश नागनाथवार, निखिलेश परदेशी, संजय राऊत आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास प्रा वि‍वेकानंद भोसले, प्रा हरिश आवारी, प्रा प्रमोदिनी मोरे, प्रा संजय पवार, प्रा मधुकर मोरे, प्रा संदिप पायळ  आदींसह महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनी, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

एड्स रोगावर आधारित राष्‍ट्रीय सेवा योजनेतंर्गत स्‍वयंसेवकांनी तयार केलेल्‍या चित्र प्रदर्शनी पाहातांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्राचार्य डॉ उदय खोडके, जिल्‍हा कार्यक्रम अधिकारी डॉ देवेंद्र लोलगे, वैद्यकीय अधिकारी डॉ मंजुषा कुलकर्णी, वैदयकीय अधिकारी डॉ सुब्‍बाराव आदी.
लोकशाहीर प्रकाश कांबळे व त्‍यांचा चमु शाहीरीच्‍या माध्‍यमातुन एड्स रोगाबाबत प्रबोधन करतांना