Thursday, January 29, 2015

बियाणाबाबत शेतक-यांची फसवणुक होऊ नये यासाठी विद्यापीठ व बीजप्रमाणीकरण यंत्रणेने समन्‍वयाने कार्य करावे ....... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

रब्‍बी पिके बिजोत्‍पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न

कार्यक्रमात अध्‍यक्षीय भाषण करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ व्‍ही डी सोळुंके, श्री सुदाम घुगे आदी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या बीज तंत्रज्ञान संशोधन व पैदासकर बियाणे उत्‍पादन विभागाच्‍या वतीने अखिल भारतीय अनुसंधान परिषदेच्‍या प्रकल्‍पांर्गत रब्‍बी पिके बिजोत्‍पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि २८ जानेवारी रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू होते तर संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विभागीय बीजप्रमाणिकरण अधिकारी सुदाम घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रशिक्षण कार्यक्रमात परभणी व जालना येथील विभागीय बीज प्रमाणिकरण यंत्रणा व महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळाच्‍या ६४ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
   अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू म्‍हणाले की, शेतक-यांची  बियाणाबाबत फसवणुक होऊ नये आणि वेळेवर बियाण्‍याची उपलब्‍धता व्‍हावी यासाठी विद्यापीठ व बीजप्रमाणीकरण यंत्रणेने समन्‍वयाने कार्य करावे. मराठवाडयात ग्राम बीजोत्‍पादन कार्यक्रमास मोठा वाव असुन त्‍यासाठीही प्रयत्‍न करणे गरजेचे आहे.
  सशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, विद्यापीठ प्रक्षेत्रावर करडई, सोयाबीन, तुर आदी पीकांचे बिजोत्‍पादनाकरिता मोठया प्रमाणात यांत्रिकीकरणाचा वापर करण्‍यात आले असुन सार्वजनिक - खाजगी भागदारी तत्‍वाच्‍या आधारे बिजोत्‍पादन करण्‍यास मोठा वाव आहे.
   या प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ. एस. बी. सरोदे यांनी हरभरा बिजोत्‍पादन, डॉ. एस. बी. घुगे यांनी करडई बिजोत्‍पादन तर गहू बिजोत्‍पादन यावर डॉ. व्हि. डी. साळुंके व रब्‍बी ज्‍वार बिजोत्‍पादन तंत्रज्ञानाबाबत प्रा. अंबीका मोरे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थीनी ज्‍वार संशोधन केंद्र, गहू संशोधन केंद्र, करडई संशोधन केंद्र व सोयाबीन संशोधन केंद्र येथील प्रक्षेत्रावरील विविध पिकांच्‍या वाणाच्‍या बिजोत्‍पादन पा‍हाणी केली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सहयेागी संचालक (बियाणे) डॉ. व्‍ही. डी. सोळूंके यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. व्हि. एम. घोळवे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. एस. बी. घुगे यांनी केले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी प्रा. आर एम कोकाटे, श्री एम बी भोसले, श्री व्‍ही जे बोंडे, श्री अनिल मुंढे, मो. सलीम, डॉ. रोहीत सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
प्र‍शिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थी 
मार्गदर्शन करतांना संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर