मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ उदय खोडके |
युवाशक्ती हीच देशाची खरी
संपत्ती असून देशाच्या विकासात युवकांचे मोलाचे योगदान आहे, असे
प्रतिपादन कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व
प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी केले. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या
जयंतीनिमित्त दिनांक 12 जानेवारी रोजी आयोजीत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालयातील कार्यक्रमात ते बोलत होते. प्रखर राष्ट्रवाद व
सर्वधर्मसमभाव ही विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य असुन स्वामी विवेकानंदांचे विचार आजही युवकांसाठी मार्गदर्शक आहेत. जीवनात यश
मिळवण्यासाठी कठीण परिश्रमाशिवाय पर्याया नाही, युवकांनी स्वामी
विवेकानंदाच्या व्यक्तीमत्वापासुन प्रेरणा घेऊन समाजासाठी कार्य करावे,
असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. याप्रसंगी व्यासपीठावर जिमखाना उपाध्यक्ष्य प्रा. विवेकानंद
भोसले, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, प्रा. हरीश आवारी आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मधुकर मोरे यांनी केले तर
सूत्रसंचालन प्रसन्ना पवार व आभार प्रदर्शन प्रदीप तौर यांनी केले. यावेळी
विद्यार्थी अक्षय ढाकणे, उमेश राजपूत,
गोविंद फुलारी, रामेश्वर गिराम आदींनी आपले
विचार मांडले तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखविण्यात
आली. मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे
पूजन करण्यात आले तर सहाव्या सत्राच्या विद्यार्थिनिनी स्वागत गीत गायिले.
कार्यक्रमास प्रा. पंडीत मुंडे, प्रा. दयानंद टेकाळे,
प्रा. सुमंत जाधव, प्रा.संदीप पायाळ, प्रा. गोपाळ शिंदे, प्रा. रवींद्र शिंदे, प्रा. प्रमोदिनी मोरे, प्रा. संजय पवार, प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे, श्री. शिवणकर, श्री.फाजगे, श्री. उबाळे, श्री.
मनोहर आदींसह महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.
भाषण करतांना विद्यार्थी अक्षय ढाकणे व्यासपीठावर प्राचार्य डॉ उदय खोडके, जिमखाना उपाध्यक्ष प्रा. विवेकांनद भोसले व डॉ स्मिता खोडके |