Thursday, February 12, 2015

शेती समस्यांच्‍या निराकरणासाठी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी.......कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलु

हिंगोली जिल्हयातील सापटगाव (ता. सेनगावयेथे उमेद कार्यक्रम
प्रभातफेरीच्‍या प्रसंगी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ बी बी भोसले, डॉ उदय खोडके आदीं 
शालेय विद्यार्थ्‍यानी शेतकरी नृत्‍य सादर केले त्‍यावेळी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ बी बी भोसले, डॉ उदय खोडके आदी
अनिश्चित हवामान व कमी पर्जन्यमानामुळे बदललेल्या परिस्थितीला शेतक-यांनी धैर्याने तोंड दयावे. विद्यापीठ शेतकऱ्यांच्या विविध शेती समस्यांच्या निराकरणासाठी सदैव पाठीशी आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी.व्यंकटेश्‍वरलु यांनी केले.
   पर‍भणी येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने हिंगोली जिल्हातील सापटगाव (ता. सेनगावयेथे शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी उमेद कार्यक्रमाचे दि ११ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते, त्‍या कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमास विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसलेसहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडकेसरपंच नामदेवराव अवचारतालुका कृषी अधिकारी रवी हरणे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. पी. पी. शेळके, प्रा. राजेश भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, शेतक-यांनी शेतीतील सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, शेतीपूरक व्यवसाय करावेत म्‍हणजे आर्थिक स्‍थैर्य येईल. विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी.बी. भोसले आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, पीक उत्‍पादन वाढीसाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा वापर करावा, यामुळे पीक उत्‍पादन खर्च कमी होऊन अपेक्षित उत्‍पादन प्राप्‍त होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके म्‍हणाले की, ज्यांनी पावलोपावली दुःख भोगले तोच नेहमी इतरांना आनंदी ठेवू शकतो. शेतकरी बांधवाना प्रोत्साहन देण्याचे कार्य उमेद कार्यक्रमाच्‍या माध्यमातून विद्यापीठ करीत असल्‍याचे सांगितले. याप्रसंगी शेतकऱ्यांनी दुःखद विवंचनेतून मुक्त व्हावे याकरिता प्रा. जयप्रकाश पाटील गोरेगावकर यांनी ह्रदयस्पर्शी ग्रामगीत सादर केले. 
तांत्रिक चर्चासत्रात कोरडवाहू शेतीकरिता उपयुक्त अशा जलसंधारण सरीआंतरपिक पध्‍दतीबीबीएफ लागवड, विहीर पुर्नभरणशेततळे व संरक्षित सिंचन, हळद व डाळींब लागवड, अपारंपरिक उर्जा व सौर फवारणी यंत्रे आदींवर डॉ. आनंद गोरे, प्रा. सुमंत जाधव, प्रा. मधुकर मोरे, श्री. संजय पवार, प्रा. शिवाजी शिंदे, प्रा. संदीप पायाळ यांनी मार्गदर्शन केले व शेतक-यांनी उपस्थित केलेल्‍या तंत्रज्ञानाबाबत प्रश्‍नांना व समस्‍यांना कृषि शास्‍त्रज्ञांनी उत्‍तरे दिली.
कार्यक्रमाची प्रारंभी जिल्हा परिषदेच्‍या शाळेतील विद्यार्थी व रासेयो स्वयंसेवकांची गावातून प्रभातफेरी काढून जागर करण्यात आला. विशेष म्‍हणजे शाळेचे मुख्याधापक व सर्व शिक्षक मार्गदर्शनाखाली प्रभातफेरीत सर्व शालेय विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या पोशाखात सहभागी नोंदविला होता. कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी मनमोहक असे शेतकरी नृत्यही  सादर केले. महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांनी प्रा. मधुकर मोरे लिखित मृद व जलसंधारणावरीलपथनाट्य सादर करून शेतकरी बांधवाना पाण्याच्या सुयोग्य वापराने पाणलोट क्षेत्रविकासाचे तंत्र शिकविले. प्रक्षेत्र पाहणीच्या अंतर्गत प्रगतशील शेतकरी गजानन अवचार यांच्या शेतावर खडकाळ जमिनीत वाढविलेल्या डाळिंब बागेची पाहणी मान्‍यवरांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. रवींद्र शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. गोपाल शिंदे यांनी केले. कार्यक्रमास सापटगावं व परिसरातील गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी विद्यार्थी कल्पना भोसले, पूजा सस्ते, देविका बलखंडे, कोमल गाडेकर, ऐश्वर्या देवकाते, गोविंद फुलारी, सुयोग खोसे, महेश देशमुख, प्रसाद वारे, सुशांत वान्नाले, राहुल तांबे, संतोष कुरे, शंकर जवळकर, प्रीतीश पवार, अमृत मुडके आदींनी परिश्रम घेतले.
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु
प्रभातफेरी प्रसंगी