Monday, August 1, 2016

पाच दिवसीय माती तपासणी व विश्‍लेषण या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि विभागीय कृषि विस्तार व्यवस्थापन आणि प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद (रामेती) यांच्या संयुक्‍त विद्यमाने मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागात दिनांक 1 ते 5 ऑगस्‍ट दरम्‍यान पाच दिवसांचे राज्यस्तरीय माती तपासणी व विश्‍लेषण या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक 1 ऑगस्‍ट रोजी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ अशो ढवण यांच्या हस्ते उदघाटन करण्‍यात आले. यावेळी व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ. विलास पाटील, रामेती प्राचार्य श्री. उदय नलावडे, विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश वाईकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, माती तपासणी प्रयोगशाळेत कार्य करण्यासाठी महिलांना मोठी संधी आहे. प्रयोगशाळेतील नियोजन आणि बारकावे याचे ज्ञान महिलांना मुळातच अवगत असते. प्राचार्य डॉ विलास पाटील यांनी जमिनीच्या गुणधर्मांचा इतर अन्नद्रव्यांचा असलेला परस्पर संबंध आणि त्यांचे माती परीक्षणातील महत्व यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकाडॉ. सुरेश वाईकर यांनी प्रशिक्षणाचे महत्व विषद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. पपिता गौरखेडे तर आभार डॉ. महेश देशमुख यांनी मानले. सदरिल प्रशिक्षणात कृषि विभागाच्या प्रयोगशाळेतील विविध अधिकारी कर्मचारी यांना प्रयोगशाळेत माती तपासणी व विश्‍लेषण प्रशिक्षणव्दारे शिकवले जाणार असुन मिनीच्या विवि गुणधर्मांचे बौधिक व प्रात्यक्षिकाव्दारे माहीती देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी मराठवाड्यातील कृषि विभागातुन आठ जिल्हातील वीस अधिकारी व कृषि सहाय्यक यांनी सहभाग नोंदविला आहे. प्रशिक्षणाचे आयोजन विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले असुन या लाभ मृद परिक्षण अधिकारी पर्यायाने मराठवाडा विभागातील शेतकरी बांधवाना फायदेशीर ठरणार आहे. कार्यक्रम यस्वीतेसाठी डॉ. सय्यद ईस्माईल, डॉ अनिल धमक, प्रा. गलांडे, प्रा. प्रभाकर अडसुळ, डॉ. सदाशिव अडकीणे, इतर कर्मचारी व पदव्युत्तर विद्यार्थी यांनी सहकार्य केलेे. कार्यक्रमास विभाग प्रमुख, अधिकारी, प्राध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.