Friday, August 5, 2016

मौजे जांब येथे कृषिदूतांमार्फत पशुलसीकरण मोहीम

परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांचा उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीक सोयाबीन संशोधन प्रकल्प येथे कार्यरत असलेल्‍या परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांनी मौज जांब येथे दि. 4 ऑगस्‍ट रोजी सार्वजनिक पशु लसीकरण मोहीम आयोजित केली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले हे उपस्थित होते तर उपसरपंच श्री. अजय जामकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वि उ कावळे, प्रकल्प प्रभारी अधिकारी डॉ. एस. पी. म्हेत्रे, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे, कार्यक्रमाधिकारी डॉ एस एल बडगुजर आदींची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले यांनी गावातील पशुपालकांना जनावरांचे नियमीत लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. डॉ. बी एम ठोंबरे यांनी पशुंच्या लसीकरणाचे महत्व विशद केले तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वि उ कावळे यांनी पशुंचे लाळ खुरकत व घटसर्प आदी रोगांच लसीकरण केले. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एल. बडगुजर यांनी केले. सुत्रसंचालन कृषिदूत अक्षय कर्डीले यांनी तर गणेश काळे यांनी आभार मानले. लसीकरण मोहीमे अंतर्गत गावातील दिडशे पेक्षा जास्‍त जनावरांचे लसीकरण करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वतीसाठी कृषिदूत म्हणून प्रकाश गोरे, स्‍वप्निल मुनेश्‍वर, सागर जगधने, गजानन जाधव, गजानन हरके, तोशिब मोगल, गणेश काळे,  शाम कच्‍छवे आदीसह शेतकरी बांधवांनी परिश्रम घेतले.