Thursday, September 8, 2016

वनामकृविच्‍या वतीने बदनापुर (जिल्‍हा जालना) येथे रबी शेतकरी मेळाव्याचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचे कृषी विभाग (जिल्‍हा जालना) यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती दिनानिमित्‍त दिनांक १७ सष्‍टेबर रोजी बदनापुर (जिल्‍हा जालना) येथील कृषी महाविद्यालयात रबी पीक शेतकरी मेळाव्‍याचे सकाळी १०.३० वाजता आयोजन करण्‍यात आले असुन मेळाव्‍याचे उद्घाटन महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषी व फलोत्‍पादन मंत्री तथा विद्यापीठाचे प्रती कुलपती मा. ना. श्री. पांडूरंगजी फुंडकर यांच्‍या हस्‍ते होणार आहे. मेळाव्‍यास परिवहन व खारभुमी विकास मंत्री मा. ना. श्री. दिवाकररावजी रावते, पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता मंत्री तथा जालन्‍याचे पालकमंत्री मा. ना. श्री. बबनराव लोणीकर व वस्‍त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्‍स्‍यविकास राज्‍यमंत्री मा. ना. श्री. अर्जुन खोतकर यांची प्रमुख अतिथी म्‍हणुन उपस्थिती लाभणार असुन जालना जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष मा. श्री. तुकाराम जाधव, पुणे येथील कृषी परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. डॉ. राम खर्चे, जालना लोकसभा सदस्‍य खासदार मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे, विधान परिषद सदस्‍य आमदार मा. श्री. विक्रम काळे, विधान परिषद सदस्‍य आमदार मा. श्री. सतिश चव्‍हाण, विधान परिषद सदस्‍य आमदार मा. श्री. सुभाष झांबड, विधानसभा सदस्‍य आमदार मा. श्री. राजेश टोपे, विधानसभा सदस्‍य आमदार मा. श्री. नारायण कुचे, विधानसभा सदस्‍य आमदार मा. श्री. संतोष दानवे, विभागीय आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट व कृषी आयुक्‍त मा. श्री. विकास देशमुख यांची विशेष अतिथी म्‍हणुन उपस्थिती लाभणार आहे. मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु राहणार आहेत. मेळाव्‍यात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ रबी पीकाबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करणार असुन विद्यापीठ विकसित विविध तंत्रज्ञान आधारित प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले आहे, तरी मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बाळासाहेब भोसल, कुलसचिव श्री दिलीप कच्‍छवे, जालना जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. दशरथ तांभाळे व बदनापुर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी केले आहे.