वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण
महिला व बालकांचे योगदान, आरोग्य व विकास वृध्दींगत करण्यासाठी कृषि विज्ञान
केंद्राच्या गृहविज्ञान विषयतंज्ञाकरिता तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २० ते २२
सप्टेंबर दरम्यान करण्यात आले असुन कार्यशाळेचे उद्घाटन भुवनेश्वर येथील केंद्रीय
कृषीरत महिला संस्थेच्या संचालिका डॉ. जतिंदर किश्तवारिया यांच्या हस्ते
होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
हे राहणार असुन हैद्राबाद येथील कृषी तंत्रज्ञान उपयोगीता संशोधन संस्थेचे संचालक
डॉ. वाय. जी. प्रसाद, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण
संचालक डॉ. बी. बी. भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती कार्यशाळेच्या
आयोजिका गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्या प्रा.
विशाला पटणम व प्रा. जयश्री झेंड यांनी कळविली आहे.