वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या
चाकुर (लातुर) येथील कृषि व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर संस्थेत माजी विद्यार्थ्यीच्या मेळाव्याचे आयोजन दिनांक १२ व १३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सहयोगी अधिष्ठाता
व प्राचार्य प्रा हेमंत पाटील यांच्या हस्ते झाले तर समारोप शिक्षण संचालक डॉ
अशोक ढवण यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. दोन दिवस चालेल्या या
मेळाव्यात महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या करिअर मधील अनुभव
सांगुन भविष्य विविध क्षेत्रातील संधीबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिनांक १३ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले
होते, यात विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यी संघटनेचे
अध्यक्ष अमोल दौने यांनी मनोगत व्यक्त करून आभार प्रदर्शन केले. तसेच धारवाड
कृषि विद्यापीठात आचार्य पदवीसाठी शिक्षण घेत असलेली माजी विद्यार्थ्यींनी ज्योती
हिनेही मार्गदर्शन केले. सदरिल महाविद्यालयाची स्थापना २००९ साली झाली असुन
प्रथमच माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हेमंत पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.