वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विदयापीठातील विस्तार शिक्षण संचालनालयाच्या लिंबूवर्गीय
फळपिकांवर मराठवाडाकरिता तत्रंज्ञान अभियांनातर्गत चार दिवसीय निवासी प्रशिक्षण
कार्यक्रम दिनांक 07 ते 10 मार्च दरम्यान मोसंबी, संत्रा व लिंबू उत्पादक बागायतदारांकरीता आयोजित करण्यात आला
आहे. प्रशिक्षणात रोपवाटीका व्यवस्थापन, उत्पादन, पिक संरक्षण व काढणी पश्चात
तंत्रज्ञान आदीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीची निवासाची व
भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असून प्रशिक्षणाकरीता परभणी येथे येण्याचा व
जाण्याचा खर्च प्रशिक्षणार्थीना स्वत: करावा लागेल. सदरील प्रशिक्षण विदयापीठ
प्रशासकीय इमारती समोरील शेतकरी भवन येथे आयोजीत करण्यात आले आहे. तरी
मराठवाडयातील इच्छूक लिंबूवर्गीय फळ उत्पादक बागायतदारांनी दिनांक 1 मार्च
पर्यंत टिएमसीचे प्रभारी अधिकारी प्रा आर एस बोरडे (भ्रमणध्वनी क्र 7588156217 किंवा दुरध्वनी क्रमांक 02425-220685) व विस्तार शिक्षण संचालनालयाशी
संपर्क साधुन आपली नावनोंदणी करावी. प्रथम येणा-यास प्राधान्य देण्यात येणार
असून मर्यादीत साधरणत: 40 ते 50 बागायदारांना प्रशिक्षण देण्यात येईल तसेच
बागायदारांच्या प्रतिसादानुसार सदरील प्रशिक्षण पुन्हा एकदा आयोजीत करण्यात येईल, असे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी कळविले आहे.