Thursday, February 9, 2017

कृषि विद्यापीठातील मनुष्‍यबळाच्‍या कौशल्‍य विकासासाठी प्रशिक्षणावर भर द्यावा लागेल.......कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्‍या वतीने आयोजित राज्यस्तरीय एकवीस दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप
कोणत्‍याही संस्‍थेचे भविष्‍य हे संस्‍थेतील उपलब्‍ध मनुष्‍यबळावर अवलंबुन असते, कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांचे ज्ञान अद्यावत करण्‍यासाठी व कौशल्‍य विकासासाठी वेळोवेळी प्रशिक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्‍या वतीने मृदापिकजल, अन्न, चारा संशोधन व अद्यावत परिक्षण तंत्रज्ञान कौशल्य विकासया विषयावरील राज्यस्तरीय एकवीस दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या समारोपाप्रसंगी (दिनांक ९ फेब्रुवारी) ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. व्ही. के. पाटील हे उपस्थित होते तर राजेंद्रनगर (हैद्राबाद) येथील माजी शिक्षण संचालक डॉ पी. चंद्रशेखरराव, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, बदलत्या हवामानानुसार शिक्षण व संशोधन क्षेत्रात कार्यात व विविध शाखेतील प्रयोगशाळा सुसज्य करण्यासाठी सदरिल प्रशिक्षणातील ज्ञानाचा विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांना उपयोग होईल.
माजी कुलगुरू मा. डॉ. व्ही. के. पाटील आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले कीआज अन्नधान्य सुरक्षेतेसाठी कार्य करतांना कृषि शास्त्रज्ञांनी प्रशिक्षणातील ज्ञानाचा उपयोग करावा. शेतक-यांची कृषिक्षेत्रातील समस्‍या सोडविण्‍यासाठी विविध विषयात आंतरशाखीय प्रशिक्षणाची गरज असुन सदरिल प्रशिक्षणाच्‍या आयोजनाबाबत कौतुक केले.
शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले तसेच प्रशिक्षनार्थींनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण मान्यंवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक प्रशिक्षणाचे आयोजक तथा विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी केले आभार प्रदर्शन डॉ सुरेश वाईकर यांनी केले. प्रशिक्षणा देशातील नामांकित संस्थामधील शास्त्रज्ञ डॉ. पी. चंद्रशेखर राव (हैद्राबाद), श्रीचौरे (मुंबई), डॉ. व्हि. के. खर्चे, डॉ काटकर (अकोला), डॉ. अे. डी. कडलग (राहुरी), डॉ के. डी. पाटील तसेच विद्यापीठ तज्ञांंनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा शिक्षण व संशोधन क्षेत्रातील ३० शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, प्रा. प्रभाकर अडसुळ, प्रा. सनिल गलांडे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. एस.पी. झाडे, डॉ. सदाशिव अडकीणे, श्री अनिल मोरे आदींनी परिश्रम घेतले.