वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि
रसायनशास्त्र विभाग आणि जिल्हा कृषि अधिकारी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जमिनीचे रासायनिक गुणधर्म व मुख्य
अन्नद्रव्ये तपासणी या विषयावरील पाच दिवसीय प्रशिक्षण दिनांक 27 फेब्रुवारी ते 03
मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. कृषि विभागातील माती परिक्षण प्रयोगशाळेतील विविध तंत्र अधिकारी यांना
प्रयोगशाळेत जमिनीच्या गुणधर्म पृथ:करणातील येणाऱ्या अडचणी प्रशिक्षणाव्दारे सोडविता येणार
आहेत. प्रशिक्षणासाठी जालना
जिल्हातील मृद परिक्षण तंत्र अधिकारी, प्रयोगशाळेतील 12
तंत्रज्ञ आणि कृषि सहाय्यक सहभाग नोंदविणार आहेत. सध्या जमिनीमध्ये एका पेक्षा
अधिक अन्नद्रव्यांच्या कमतरता आढळुन येत आहेत. त्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. या संदर्भात आंतरराष्ट्रीयस्तरावर जमिनीच्या आरोग्याबाबत
जागृती होण्यासाठी आतंरराष्ट्रीय मृदा वर्ष 2015
म्हणुन साजरे करण्यात आले. याच
अनुषंगाने केंद्र शासन व राज्य शासनाने मृदा आरोग्य पत्रिका वाटप कार्यक्रमावर भर दिला
जात आहे. आरोग्य
पत्रिकेत जमिनीचे विविध गुणधर्माचे पृथ:करण अद्यावत पध्दतीने करावे अशा मार्गदर्शक सुचना जिल्हा स्तरावरील माती
परीक्षण प्रयोगशाळेस प्राप्त झाल्या आहेत. सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन विभाग
प्रमुख डॉ. विलास पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली करण्यात आले असुन डॉ. अनिल धमक, डॉ. महेश देशमुख,
डॉ. सुरेश वाईकर, प्रा. प्रभाकर अडसुळ, प्रा. सुनिल गलांडे, डॉ. पपिता गौरखेडे,
डॉ. एस.पी. झाडे, डॉ. सदाशिव अडकीणे, श्री अनिल मोरे आदी कर्मचारी कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत.