Tuesday, February 19, 2019

वनामकृवित छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

प्रत्‍येकांनी शिवचरित्राचे वाचन करावे, छत्रपतींनी स्‍वराज्‍यासाठी आखलेली धोरणे, प्रशासन, शेतक-यांच्‍या कल्‍याणासाठी केलेले कार्य, युध्‍दनिती व व्‍यवस्‍थापन आदी कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्‍यांतील गुण आत्‍मसात करण्‍याचा प्रत्‍येकांनी प्रयत्‍न करावा, जीवनातील अनेक आव्‍हाने पेलतांना निश्चितच आपणास यापासुन मदत होते. या महापुरूषाच्‍या जयंती निमित्‍त त्‍यांच्‍या विचारांचे आदानप्रदान झाले पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने दिनांक 19 फेब्रुवारी रोजी आयोजित शिवजंयती साजरी करण्‍यात आली, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, कुलसचिव श्री रणजित पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्या डॉ हेमांगिणी सरंबेकर, प्राचार्य डॉ उदय खोडके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नारायण लोलमवाड यांनी केले तर आभार महेश दारूळे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.