Friday, February 22, 2019

वनामकृवित कृषि यांत्रिकीकरण प्रदर्शन व मेळावाचे आयोजन

परभणी : अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प पशुशक्तीचा कृषि क्षेत्रात योग्य वापर भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि यांत्रिकीकरण दिनानिमित्त दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00 वाजता पशुशक्तीचा कृषि क्षेत्रात योग्य वापर संशोधन केंद्रात कृषि अवजारे प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनीत विविध कृषि अवजारे तसेच अपारंपारिक उर्जा उपकरणे व मशिनरी संबंधी कंपन्या व विक्रेते सहभागी होणार असुन मेळाव्‍यात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत, तरी शेतकरी बांधवानी मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन संशोधन अभियंता प्रा. एस. एन. सोलंकी यांनी केले आहे.